Sand Mafia : वाळुची चोरी रोखण्यात अपयश; कृषी अधिकाऱ्यासह तलाठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली निलंबनाची कारवाई

नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळुची चोरी होत असल्याचे कविता जाधव यांना निदर्शनास आले.
Collector Avinash Pathak
Collector Avinash Pathakesakal
Updated on
Summary

बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील एसडीएम कविता जाधव यांनी राक्षसभूवन येथे गोदावरी नदीच्या (Godavari River) पात्रात ड्रोनच्या माध्यमातून पाहणी केली.

जातेगाव (जि. बीड) : वाळू चोरी (Theft of Sand) रोखण्यात अपयश आलेल्या एका मंडळ अधिका-यासह तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून जिल्हाधिकारी अविनाश पाठक (Collector Avinash Pathak) यांनी दणका दिला. यामुळेच महसूल कर्मचा-यांचे धाबे दणाणले आहेत.

राक्षसभूवन (गेवराई) येथून वाळूचा उपसा होत असल्याने बुधवारी (ता. ३) बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील एसडीएम कविता जाधव यांनी राक्षसभूवन येथे गोदावरी नदीच्या (Godavari River) पात्रात ड्रोनच्या माध्यमातून पाहणी केली. या पाहणीत नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळुची चोरी होत असल्याचे कविता जाधव यांना निदर्शनास आले. याबाबतचा अवहाल एसडीएम जाधव यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे सादर केला.

Collector Avinash Pathak
मोठी बातमी! एसटी सरकार गँगचा म्होरक्या संजय तेलनाडे काँग्रेस कमिटीत; 'त्या' व्हिडिओनंतर पोलिसांकडून कारवाई सुरू

या अहवालात धोंडराईचे मंडळ कृषी अधिकारी पुरुषोत्तम आंधळे, राक्षसभूवन सजाचे तलाठी किरण दांडगे यांनी प्रशासकीय कामात हलगर्जीपणा दाखवत कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवल्याने गुरुवारी (ता. ४) जिल्हाधिकारी पाठक यांनी मंडळ अधिकारी आंधळे व तलाठी दांडगे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. दरम्यान, राक्षसभूवनप्रमाणे राजापूर येथूनही गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू चोरी होत असल्याने येथील संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.