संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा : शिवसेना

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असताना, काही लोक जाणीवपूर्वक संचारबंदी आणि लॉकडाऊनचे उल्लंघन करत आहेत. इतवारा पोलिस ठाण्यात काल रात्री जमलेला जमाव हा त्याचाच एक भाग असून संचारबंदी आणि लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, उमेश मुंडे, आनंदराव बोंढारकर, शहरप्रमुख तुलजेश यादव यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

इतवारा पोलिस ठाण्यात जमलेल्या मुस्लिम समाजाच्या जमावर गुन्हा दाखल करू नये यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव टाकणाऱ्या स्थानिक नेत्यांवरही कारवाई करा, त्यांच्याही मुसक्या आवळा. गरज पडल्यास शिवसैनिक पोलिसांच्या मदतीसाठी धावून येतील असा इशाराही नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

काही लोक जाणीवपूर्वक पोलीस प्रशासनावर दबाव आणत आहेत

देशभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. अशा परिस्थितीत कोरोना विरुद्ध सुरू असलेला लढा जिंकण्यासाठी महाराष्ट्र सरकारही निकराची झुंज देते आहे. विविध उपाययोजना करत राज्यातही लॉकडाऊन आणि संचार बंदीचे आदेश लागू करण्यात आले. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाच्या अन्नधान्याची व्यवस्थाही महाराष्ट्र सरकारने केली आहे. कोरोनाचे प्रत्येक संशयित आणि कोरोनाग्रस्त रुग्ण शोधून काढण्याचे काम करणाऱ्या पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी काही लोक जाणीवपूर्वक पोलीस प्रशासनावर दबाव आणत आहेत. रविवारी (ता. पाच) रात्री इतवारा पोलिस ठाण्यावर जो जमाव जमला होता. त्या जमावाने पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. 

पोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी पडू नये

नांदेड शहर आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना इतक्या मोठ्या संख्येने जमाव एकत्रीत आलाच कसा ? असा सवालही नांदेड जिल्हा शिवसेनेने उपस्थित केला आहे. संचारबंदीचे उल्लंघन करून जो जमाव पोलिस ठाण्यावर चालून आला होता त्या जमावातील प्रत्येकावर कठोरातील कठोर गुन्हे दाखल करावेत. भविष्यात असा जमाव एकत्र येणार नाही. यासाठी पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान नांदेड शहर आणि जिल्ह्यात संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍याविरुद्ध कारवाई करताना पोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी पडू नये. शिवसेना आणि शिवसैनिक आपल्या पाठीशी कायम आहेत. गरज पडल्यास नांदेड पोलिसांच्या मदतीला शिवसैनिक रस्त्यावर उतरतील येतील अशी माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली. 

हा लढा धार्मिक नसून तो संबंध मानवजातीच्या बचावासाठीचा 

या अनुषंगाने बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुखांनी सांगितले की, कोरोनाविरुद्धचा सुरू असलेला हा लढा धार्मिक नसून तो संबंध मानवजातीच्या बचावासाठीचा आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी धर्म, जात, वंश याचा आधार न घेता कारोणाच्या लढाईत सहभागी व्हावे. देशावर आलेल्या महमारीच्या संकटाला दूर करण्यासाठी पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेल्या प्रत्येक आदेशाचे तंतोतंत पालन करून महाराष्ट्रातून आणि देशातून कोरोनाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत. पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, संचारबंदीचे उल्लंघन करू नये जर असे दिसल्यास पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.