Jalna : नगरपालिकेवर कराचा बोजा कायम!

यंदा केवळ २७ टक्के कर वसुली; थकबाकीचा डोंगर वाढतच चालला
Jalna : नगरपालिकेवर कराचा बोजा कायम!
sakal
Updated on

जालना : नगरपालिकेला यंदा शंभर कोटीपेक्षा अधिक कराची वसुलीचे उद्दिष्टे होते. मात्र, मार्च अखेरपर्यंत नगरपालिका प्रशासनाकडून केवळ २७ कोटी २१ लाख ६४ हजारांची कर वसुली केली आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेने मालमत्ता जप्तीची कारवाई केल्यानंतरही जालनेकरांनी कर भरण्याकडे काणाडोळा केला, त्यामुळे मार्चअखेर केवळ २७.०३ टक्के कर वसुली झाली आहे.

जालना नगरपालिकेला मार्च २०२३ अखेरपर्यंत १०० कोटी ६७ लाख १७ हजारांची कर वसुलीचे उद्दिष्टे होते. त्यानुसार नगरपालिकेने कर वसुलीची मोहीम राबविली. शिवाय थकीत असलेल्या मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्तीची कारवाई ही केली. मात्र, तरी देखील नगरपालिका प्रशासनाला पन्नास टक्के ही कर वसुली करता आली नाही.

१०० कोटी ६७ लाख १७ हजारांपैकी मागील थकीत कराची रक्कम ही ७० कोटी तीन लाख ५६ हजार होती. तर गेल्या आर्थिक वर्षातील कराची रक्कम ही ३० कोटी ६३ लाख ६१ हजार होती. त्यापैकी मार्च अखेर नगरपालिका प्रशासनाने थकीत करापैकी १८ कोटी ३० लाख पाच हजार तर गेल्या आर्थिक वर्षातील करापैकी आठ कोटी ९१ लाख १४ हजार असा एकूण २७ कोटी २१ लाख ६४ हजारांचा कर वसुल केला आहे.

Jalna : नगरपालिकेवर कराचा बोजा कायम!
Jalna : भाषणबाजी, नेत्यांपायी लग्नघटिकेचा विसर; नव्या ट्रेंडवर पौरोहित्य करणाऱ्याचं म्हणणं काय?

त्यामुळे तब्बल ७३ कोटी ४५ लाख ५३ हजारांवर कर थकबाकीचा आकडा गेला आहे. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात नगरपालिकेच्या थकीत कराचा डोंगर वाढल्याचे चित्र आहे.

सुविधा पुरविताना दमछाक

गेल्या काही वर्षांपासून जालना शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तिजोरीत फारशी भर नसलेल्या पालिका प्रशासनाची विस्तारीत भागांना सुविधा पुरविताना दमछाक होत आहेत. त्या या विस्तारीत सुविधा पुरविताना पालिकेवर खर्चाचा अधिक भारही पडत आहे.

मात्र, दुसरीकडे नागरिकांकडून कर भरणार होत नसल्याचे पालिका कर वसुलीच्या आकड्यांवरून दिसत आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडण्यासाठी नागरिकांनीही कर भरणे अपेक्षित आहे, शिवाय कर वसुलीकडे पालिकेला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

नगरपालिका कर वसुलीचे उद्दिष्ट

कराचे प्रकार थकबाकी कर गेल्या आर्थिक वर्षातील कर

  • मालमत्ता कर- २६,०९,७३,००० १५,८४,४३,०००

  • शिक्षण कर- १३,५५,०२,००० ५,१६,७६,०००

  • पाणी कर- १८,४०,९२,००० ५,००,८४,०००

  • वृक्ष कर- १,५९,११,००० ५५,०३,०००

  • अग्नी कर- ३,२२,३४,००० १,१०,०६,०००

  • स्वच्छता कर- ४,६५,५२,००० १,९४,८७,०००

  • एकूण- ७०,०३,५६,००० ३०,६३,६१,०००

Jalna : नगरपालिकेवर कराचा बोजा कायम!
Jalna : मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी यंदा वाढले इच्छुक

मार्च २०२३ अखेर नगरपालिकेने केलेली कर वसुली

कराचे प्रकार थकबाकी कर गेल्या आर्थिक वर्षातील कर

  • मालमत्ता कर ११,६७,१६,००० ५,२२,३३,०००

  • शिक्षण कर १,८१,१९,००० १,१३,०५,०००

  • पाणी कर २,३६,४६,००० १,२६,३१,०००

  • वृक्ष कर- ३०,२६,००० १७,०७,०००

  • अग्नी कर- ६०,२५,००० २९,१५,०००

  • स्वच्छता कर- १,२७,०४,००० ५६,५९,०००

  • एकूण - १८,३०,०५,००० ८,९१,१४,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.