Kaij Assembly constituency Voting : निवडणूकीत सेवा बजावणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्याचे निधन; केज शहरातील घटना
Vidhan Sabha Elections 2024 : केज विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत क्रमांक-२ चे कर्मचारी म्हणून सेवा बजावत असलेल्या शिक्षक मुकुंद भालेराव यांचे दुर्दैवी निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते आणि ते निवडणुकीच्या सेवेत होते.
केज : केज विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत क्रमांक-२ चे कर्मचारी म्हणून सेवा बजावणाऱ्या एका शिक्षकाच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.२१) रोजी पहाटेच्या सुमारास केज येथे घडली. मयत झालेल्या शिक्षकाचे नाव मुकुंद गुलाबराव भालेराव (वय-५५) असे आहे.