१२१ वर्षांची परंपरा असलेला ‘टेंबे’ गणपती

आज होणार स्थापना ः पाच दिवस राबविले जाणार विविध सामाजिक उपक्रम
ganpati
ganpatisakal
Updated on

माजलगाव : मागील १२१ वर्षांपासून स्थापनेची परंपरा अखंडित ठेवणारे टेंबे गणेश मंडळ आहे. माजलगावचा मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या या टेंबे गणपतीची शुक्रवारी (ता. १७) स्थापना होणार आहे.

शहरातील ढुंढीराज टेंबे गणेश मंडळाला अनेक वर्षांची परंपरा असून गणेशोत्सव काळात समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यावर मंडळाचा भर असतो. कोरोना काळात गोर-गरीब, वंचित, उपेक्षित लोकांना सलग ४५ दिवस अन्नदानाचा यज्ञ मंडळाच्या वतीने सुरू होता तर किराणा किटचे देखिल वाटप करण्यात आले. यंदा देखिल लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना मास्क शिवाय दर्शनाला परवानगी नाही. याठिकाणी थर्मल गनने स्कॅनिंग तसेच सॅनिटायझरही ठेवण्यात आलेले आहे. शासनाच्या नियमानुसारच अडीच फुटांची इकोफ्रेंडली गणेशमूर्ती स्थापन केली जाणार आहे. मंडळाने जोशी गल्लीमध्ये स्वतःची जागा खरेदी केली असून या जागेत गणरायाची भाद्रपद एकादशीला म्हणडे आज (ता.१७) धार्मिक विधीसह स्थापना होणार आहे. तर भाद्रपद प्रतिपदेस (ता.२१) विसर्जन होणार आहे.

ganpati
'खासदार इम्तियाज जलील यांनी राजकारण करु नये'; पाहा व्हिडिओ

स्थापनेसाठी हैद्राबादेतून आणली परवानगी

सुमारे १२० वर्षांपूर्वी निजामकालीन राजवटीत स्थापना मिरवणूक परवानगी नसल्याच्या कारणावरून अडविण्यात आली होती. त्यामुळे सदस्यांनी मिरवणूक अडविलेल्या ठिकाणाहून घोड्यावर हैद्राबादपर्यंत जात येथून ताम्रपटावर स्थापना परवानगी आणली होती. यामुळे पाच दिवस गणपती त्याचठिकाणी थांबविण्यात आला होता. एकादशीला गणपतीची स्थापना करून भाद्रपद प्रतिपदेस या गणरायाचे विसर्जन केले जाते.

ganpati
गल्लोगल्लीत फिरणार दोन कृत्रिम तलाव

शुक्रवारी (ता.१७) भाद्रपद एकादशीला सायंकाळी ५.४५ वाजता टेंबे गणपतीची विधीवत पुजा करून स्थापना करण्यात येणार आहे. दररोजची आरती पाच भाविकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. शासनाने घालून दिलेल्या कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत स्थापना मिरवणूक व विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाही. तर भाविकांना महाआरतीचे दररोज सोशल मीडियावरून लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.

-अनंत जोशी, अध्यक्ष, टेंबे गणेश मंडळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.