नांदेड : जिल्हा टेम्पो असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (ता. तीन एप्रिल २०२०) रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री यांच्यासह प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या नावे एक निवेदन प्रसिद्ध करुन लॉकडाऊन परिस्थितीत घर चालवणे आणि ट्रक - टेम्पोचालकांचे पगार देणे मुश्किल होत आहे. यात ट्रक व टेम्पो चालक मालकावर रोड टॅक्स भरणे शक्य नाही. तेव्हा शासनाने ट्रक - टेम्पोचालक यांना पुढील तीन महिन्यापर्यंत टॅक्स माफ करावा अशी मागणी केली आहे.
दररोज सकाळी गावातून शहरात शेतीतला भाजीपाला व अन्नधान्य वाहून नेणाऱ्या ट्रक व टेम्पो चालकांनी मोठे धैर्य दाखवले आहे. मात्र लॉकडाऊन स्थितीत सुविधा देणाऱ्या ट्रक - टेम्पो चालकांना शासनाकडून साधा टोल सुद्धा माफ केला जात नसल्याने या संघटनेनी आता त्यांच्यावरील रोड टॅक्स व इतर टॅक्स तीन महिन्यापर्यंत माफ करावा, या शिवाय विमा कंपन्यांकडून आपातकालीन परिस्थिती उद्भवल्याने अर्थ सहाय्य करावे अशी महत्वाची मागणी केली आहे.
हेही वाचा- लायन्सच्या डब्यासाठी पाच हजार हात आले धावून, कसे ते वाचा
लॉकडाऊन होऊन आठवडा उलटला
ट्रक व टेम्पो चालक मालकांची मागणी रास्त असली तरी, त्यांच्या मागणीला केंद्र व राज्य सरकार कितपत मनावर घेते, याबद्दल शंकाच आहे. कारण देश लॉकडाऊन होऊन आठवडा उलटला आहे. त्यातच देशातील लॉकडाऊन कधी उठवायची या बद्दल केंद्र व राज्य सरकार मिळून बैठकावर बैठका घेऊन विचार मंथन करत आहेत.
हेही वाचले पाहिजे- नांदेडच्या ‘या’ दोन आमदारांनी दिला निधी
ट्रक - टेम्पो चालकांची मागणी रास्त
पुढील आठवड्यापर्यंत कोरोनाचे संकट आटोक्यात आल्यास ठरल्याप्रमाणे १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन स्थिती सैल होणे शक्य आहे. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत गेल्यास मात्र लॉकडाऊन अजून काही आठवड्यापर्यंत वाढवला जाऊ शकतो, असे जाणकारांचे मत असून, लॉकडाऊन ठरल्याप्रमाणे संपेल की त्यात वाढ होईल आणि अत्यावश्यक सेवा सुविधेबद्दल सरकार अजून काही वेगळा विचार करु शकते का? यावर सर्व काही अवलंबून आहे. त्यामुळे ट्रक - टेम्पो चालकांची मागणी रास्त असली तरी, त्यावर सरकार काय भूमिका घेणार हे आताच सांगता येणार नाही. असोसिएशनच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनावर सत्यपाल सावंत आणि साईनाथ जाधव यांनी स्वाक्षरी केल्या आहेत.
|