Phulambri News : पिसाळलेल्या वानराने केले दहा जणांना जखमी; बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

फुलंब्री तालुक्यातील बाबरा परिसरात वीरमगाव व ममनाबाद ही दोन्ही गावे जवळजवळ आहेत. यातील ममनाबादमध्ये दोन दिवसांपासून पिसाळलेल्या वानराने दहशत पसरवली
Monkey
Monkeysakal
Updated on

फुलंब्री : तालुक्यातील बाबरा परिसरात असणाऱ्या ममनाबाद व वीरमगाव या दोन गावांमध्ये पिसाळलेल्या वानराने दोन दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. या वानराच्या धुमाकुळीत ममनाबाद येथील सात जणांच्या मारहाणीत एक जणांचा हात मोडला, तर वीरमगावातही नऊ वर्षांच्या मुलासह तीन जणांना या पिसाळलेल्या वानराने मारहाण केली.

त्यामुळे या पिसाळलेल्या वानरांची गावात दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत. फुलंब्री तालुक्यातील बाबरा परिसरात वीरमगाव व ममनाबाद ही दोन्ही गावे जवळजवळ आहेत.

यातील ममनाबादमध्ये दोन दिवसांपासून पिसाळलेल्या वानराने दहशत पसरवली असून नागरिकांना वानर मारहाण करत आहे. ममनाबाद येथील भगवान कापसे यांना ढकलून देत मारहाण केल्याने त्यांचा हात मोडला. तर याच गावातील पंडित कापसे, गणेश पांडे, एकनाथ कापसे, रुख्मन विठ्ठल म्हस्के, कारभारी कापसे, बाळू कापसे यांना या वानराने रस्त्याने चालताना ढकलून दिले.

Monkey
One Side Love Crime : दर पाच मिनिटाला कॉल करत हाेता... एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळून विद्यार्थिनीने संपवले जीवन

तर वीरमगाव येथील तेजराव किसन कापसे, रावसाहेब विठ्ठल कापसे यांच्यासह नऊ वर्षांचा मुलगा कृष्णा प्रकाश कापसे हे तिघे या वानराने ढकलल्याने जखमी झाले. वानराच्या दहशतीमुळे घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. घर उघडे असल्यानंतर घरात घुसून दहशत माजवीत आहे. त्यामुळे या वानराचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहे.

ममनाबाद व वीरमगाव या दोन्ही गावांत पिसाळलेले वानर नागरिकांना मारहाण करत आहे. एकाचा हात मोडला, एकाचा कान तुटला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. परंतु, तत्काळ संबंधित वानर पकडणारी व्यक्ती आली नाही. आम्ही संभाजीनगर येथील खासगी व्यक्तीला फोन केला असून त्याला गावातून वर्गणी करून खर्च देण्याची तयारी केली आहे.

— कृष्णा कापसे, सरपंच पती, ममनाबाद

वानराने धुमाकूळ घातल्याची माहिती मिळाली आहे. वानर पकडणारे श्री. गिरी हे भोकरदन येथे वानर पकडण्यासाठी गेलेले आहेत. येथील त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर वीरमगाव व ममनाबाद येथे पाठवून धुमाकूळ घातलेल्या वानराला पकडण्यात येईल.

— संजय भिसे, रेंजर फॉरेस्ट ऑफिसर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.