नांदेड : आपल्या ॲटोत प्रवाशी म्हणून बसलेल्या एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणाऱ्या एका नराधमाला येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यानी दहा वर्ष सक्त मजुरी व पाच हजाराच्या दंडाची शिक्षा गुरूवारी (ता. सहा) सुनावली. या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे.
बिलोली तालुक्यातील एक सतरा वर्षीय युवती नांदेड येथे शिक्षणासाठी आपल्या एका नातेवाईकाकडे राहत होती. ती पावडेवाडी नाका परिसरात राहणाऱ्या आपल्या एका दुसऱ्या नातेवाईकाकडे ॲटोतून २६ मार्च २०१८ रोजी जात होती. ज्या ॲटोत बसली त्या ॲटोचालकाने आपल्या एका सहकाऱ्यासोबत तिला पावडेवाडी नाका परिसरातील कृषी विद्यालयाच्या पाठीमागे जबरीने शेतात नेले. तेथील एका झाडाखाली तिचे हातपाय बांधून तोंडात कपडा टाकून तिच्यावर अत्याचार केला. यावेळी तीने आरडाओरडा केल्यानंतर बाजूलाच असलेल्या काही लोकांनी धाव घेतली. तोपर्यंत आरोपी दोघेजण ॲटो घेऊन पसार झाले. जमलेल्या लोकांनी भाग्यनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद मरे आणि फौजदार सविता खर्जुले यांनी घटनास्थळाला भेट दिली. पीडीत युवतीला आपल्या सोबत घेऊन पोलिस ठाणे गाठले. लगेच तिला शासकिय रुग्णालयात दाखल केले. तीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अत्याचार व पोस्को अंतर्गत भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
हेही वाचा - नांदेडच्या ‘या’बारमध्ये क्रिकेटचा सट्टा
ॲटो चालकाचे घृणास्पद कृत्य
यातील दोन्ही आरोपींची ओळख पटविली. त्यातील ॲटो चालक शुभम उर्फ आबाद्या प्रकाश खंडागळे (वय २६) रा. कल्याणनगर याला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची पोलिसांसमोर कबुली दिली. त्याच्या सांगण्यावरून एका पायाने अपंग असलेला त्याचा साथीदार मात्र अद्याप सापडला नाही. या प्रकरणाचा तपास करून पोलिस निरीक्षक अनिरूद्ध काकडे यांनी नांदेड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात ११ साक्षिदार तपासले
न्यायालयाने या प्रकरणात ११ साक्षिदार तपासले. वैद्यकीय अहवाल व पीडीतेचे बयान आणि पोलिस तपासात उपलब्ध सबळ पुरावे हे सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. एम. ए. बतुल्ला (डांगे) यांनी न्यायालयासमोर मांडले. यावरून आरोपी शुभम खंडागळे याला दहा वर्षाची सक्त मजुरी आणि पाच हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. यातील दुसऱ्या आरोपीला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २९९ नुसार फरार घोषीत केलेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.