Terrible Accident: पंढरपुरवरून परतताना काळाचा घाला! काळी पिवळी गाडी विहिरीत पडून सात जणांचा मृत्यू

Terrible Accident Jalna: घटनेची माहिती मिळताच जालन्यातील चंदनझिरा पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे आणि अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेत आहेत.
Terrible Accident Jalna:
Terrible Accident Jalna:esakal
Updated on

जालना: जालना राजूर रोडवर तूपेवाडी फाट्याजवळ एक भीषण अपघात घडला आहे. एका चारचाकी काळी पिवळी गाडी विहिरीत पडली असून, आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह ग्रामस्थांनी बाहेर काढले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वारकरी पंढरपूर वरून घरी जात असताना हा अपघात झाला. या अपघातात सात जण जागीच ठार झाले असून सहा जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलं आहे.

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता-

ही घटना जालना राजूर रोडवर वसंत नगर पाटीजवळ तुपेवाडी शिवारात घडली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, आणखी काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गाडीतील लोकांची संख्या नेमकी किती होती, याचा तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच जालन्यातील चंदनझिरा पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे आणि अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेत आहेत.

Terrible Accident Jalna:
Manoj Jarange : २८८ पाडायचे की निवडून आणायचे २० तारखेला ठरवू; जरांगेंनी सांगितला उपोषण ते आंदोलनापर्यंतचा सगळा प्लॅन

स्थानिक ग्रामस्थांचा मदतीसाठी पुढाकार-

घटनास्थळी उपस्थित स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि विहिरीत पडलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे काही जणांना वाचविण्यात यश आले आहे.

या अपघाताबाबत अधिक तपशील मिळताच तो तत्काळ देण्यात येईल. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे प्रशासनाने म्हटले आहे. 

Terrible Accident Jalna:
Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा! निवडणूक आयोगाने दिली 'ही' परवानगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com