Accident: ट्रॅक्टर अन् दुचाकीच्या भीषण अपघात, पाच वर्षीय बालक ठार तर वडील गंभीर जखमी

Marathawada: मृतकाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत तासभर ठिय्या आंदोलन केले.
Accident: ट्रॅक्टर अन् दुचाकीच्या भीषण अपघात, पाच वर्षीय बालक ठार तर वडील गंभीर जखमी
Accident sakal
Updated on

-------- -----

Pachod Latest Update: भरधाव वेगातील ट्रॅक्टर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक पाच वर्षीय बालक जागीच ठार तर त्याचे वडील गंभीर झाल्याची घटना चौंढाळा-भांबेरी रस्त्यावर चौंढाळा (ता.पैठण) जवळ शुक्रवारी (ता.१२) दुपारी साडेबारा वाजता घडली असून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यासाठी मृतकाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत तासभर पाचोड (ता.पैठण) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात अर्धनग्न ठिय्या आंदोलन केले.

यासंबंधी अधिक माहिती अशी, खंडाळा (ता.पैठण) येथील नितीन रहेमान चव्हाण (वय ३० वर्षे) हा त्याचा मुलगा अरक्या नितिन चव्हाण (वय पाच वर्ष) यांस घेऊन आपल्या पल्सर दुचाकीवरून चौंढाळा - भांबेरी रस्त्याने जात विहामांडवा (ता.पैठण) कडे जात असताना चौंढाळ्याजवळ समोरून भरधाव वेगात येत असलेल्या ट्रॅक्टर व दुचाकीची जोराची धडक झाली. यांत पाच वर्षीय अरक्या नितीन चव्हाण हा बालक ट्रॅक्टरवर आदळून रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला. यांत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला तर त्याचा पिता नितीन चव्हाण हा गंभीर जखमी झाला.

तातडीने या पिता पुत्रांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपस्थित वैद्यकिय अधिकारी डॉ. नोमान शेख यांनी बालकास तपासून मृत घोषित केले तर नितीन चव्हाण याचेवर प्रथमोपचार करून त्यास पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकिय रुग्णालयात (घाटीत) पाठविले.या अपघाताची त्यांच्या नातेवाईकां ना माहिती समजताच त्यांनी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली व जोपर्यंत ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करीत नाही तोपर्यंत 'त्या' पाच वर्षीय बालकाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पावित्रा घेतला.

.

एवढेच नव्हे तर मृतक व जखमीच्या नातेवाईक महिलांसह पुरुषांनी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात अर्धनग्न होऊन टाहो फोडत तासभर ठिय्या आंदोलन केले. या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी संबंधीत ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पाचोड पोलीस ठाण्यात आणून जमा केला. मात्र अपघातानंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळाहून पसार झाला. पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते यांनी 'त्या' सर्व नातेवाईकांची समजूत काढून ट्रॅक्टर चालकाला अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन करणाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेत सदर बालकाचा मृतदेह ताब्यात घेतला.

यासंबंधी पाचोड पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांचेसह पोलिस उपनिरीक्षक राम बारहाते व त्यांचे सहकारी करित आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.