सेलूत कृषी उत्पन्न बाजार समितीचे शंभर बेडचे कोरोना केअर सेंटर

Pune, Pune Reports, pune jumbo covid centre,corona
Pune, Pune Reports, pune jumbo covid centre,corona
Updated on
Summary

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकरी व नागरिकांसाठी 100 बेडचे मोफत कोवीड सेंटर उभारण्यात येत आहे.

सेलू (वर्धा ) : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण (Corona Patient) आढळून येत आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या वतीने अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहात 100 बेडचे कोरोना केअर सेंटरचे (100 bed corona care center) ऑनलाईन उदघाटन (Online opening) सोमवारी ( ता.१० ) रोजी दुपारी एक वाजता होणार असल्याची माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक विनायक पावडे (Market committee chief administrator, vinayak pavade) यांनी दिली. (The 100 bed corona care center of the agricultural produce market committee in cellu will be inaugurated online on monday)

या मोफत कोरोना केअर सेंटर उदघाटन ऑनलाईन राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार विजय भांबळे, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, आ. बाबाजानी दुर्राणी, मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, शैल्य चिकित्सक श्री.नागरगोजे, तहसिलदार बालाजी शेवाळे, सहाय्यक निबंधक माधव यादव, वैद्यकिय अधीक्षक डॉ. संजय हारबडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकरी व नागरिकांसाठी 100 बेडचे मोफत कोवीड सेंटर उभारण्यात येत आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे आणि मुलांचे दोन्ही वसतीगृहांत कोरोना केअर सेंटर उभारले आहे. परंतु एप्रिल महिन्यात या दोन्ही कोरोना केअर सेंटरमधील १६० बेड फुल्ल झाले आहेत. बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरू आहे.

बाजार समितीच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय रोखण्यासाठी वालूर रस्त्यावरील अल्पसंख्याक मुलींच्या वसतीगृहात 100 बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनान दिली आहे. त्यानंतर संबंधित वसतिगृहात स्वच्छता आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना चहा, नाश्ता, दोन वेळा जेवण आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती मुख्य प्रशासक विनायक पावडे यांनी दिली.

(The 100 bed corona care center of the agricultural produce market committee in cellu will be inaugurated online on monday)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.