Ambajogai News : २० दिवसांच्या बाळाला पित्याने नेले हिस्कावून; पित्याचा शोध घेण्याचे दिले आदेश

स्वाराती रूग्णालयातील घटना
Born-Baby
Born-Babysakal
Updated on

अंबाजोगाई - स्वाराती रुग्णालयातून २० दिवसाचे बाळ पित्यानेच हिसकावून नेल्याची तक्रार बाळाच्या आईने थेट न्यायालयात केली असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी झेड. झेड खान यांनी त्या पित्याचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

या बाबत अधिक माहिती, अशी की ऊसतोड मजूर महिलेला प्रसुतीसाठी स्वाराती रूग्णालयात दाखल केले होते. (ता.५) एप्रिलला त्या महिलेची प्रसुती झाली होती. (ता.२०) एप्रिल रोजी त्याच्या पित्याने बाळाला हिस्कावून नेले. त्यामुळे ही महिला तक्रात देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात आली.

मात्र पोलिसांनी तक्रार घेण्याऐवजी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. तेथून ही महिला थेट प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे न्याय मागण्यास गेली. या महिलेची व्यथा ऐकून न्यायदंडाधिकारी यांनी सदरील बाळ घेऊन जाणाऱ्या पित्याचा शोध घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

सदरील महिला श्रमकोंडी (ता. वाशी, जि. धाराशिव) येथील असून ती सध्या सोनिजवळा (ता.केज) येथे राहत होती. या दरम्यान तिला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्याने या पिढीत महिलेच्या आईने तीला स्वाराती रूग्णालयात दाखल केले, असता तिने गोंडस बाळाला जन्म दिला.

परंतु तिचा पती राहुल विलास काळे याने स्वाराती रूग्णालयात येऊन त्याने माझ्या बाळाला जबरदरस्तीने ओढून नेले. प्रसुती दरम्यान माझी शस्त्रक्रिया झाल्यामुळे मला चालता येत नव्हते. स्वारातीच्या डॉक्टरांकडे माझ्या बाळाची चौकशी केली असता, त्यांनी पोलिसात जाण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी माझी तक्रार न घेता न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.

या महिलेने न्यायालयातील टंकलेखक दुर्गादास दामोशन यांच्या सहकार्याने व अ‍ॅड. वैजनाथ वांजरखेडे यांच्यामार्फत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकरी झेड. झेड. खान यांच्याकडे अर्ज करून घडलेला प्रकार सांगितला. न्यायदंडाधिकरी यादच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली, असता त्यांनी या महिलेच्या बाळाचा शोध शहर पोलिसांनी तात्काळ करावा असे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.