फुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या विभाजनावरच उमेदवारांचे भवितव्य ठरणार असल्याची परिस्थिती दिसून येऊ लागली आहे. छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या दहा वार्डातील मतदारांची भूमिका फुलंब्री विधानसभा मतदारसंघात निर्णय ठरणार आहे. यावरच उमेदवाराची विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्याकडून मतदानाच्या विभाजनाची आकडेमोड सुरू आहे.