Electric vehicle : इलेक्ट्रीक गाडी बंद पडतेय...नो प्रॉब्लेम! दुरुस्तीसाठी ‘ओपन एअर सोल्युशन’ स्टार्टअप

Electric vehicle
Electric vehicle esakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर, : सन २०१० पासून आतापर्यंत लो स्पीड, हायस्पीड अनेक इलेक्ट्रीक गाड्यांची विक्री झाली. मात्र ही गाडी रस्त्यात बंद पडली. नादुरुस्त झाली तर काय करावे, कुठे जावे असा प्रश्‍न अनेकांना पडतो. नियमित रस्त्यांवर असलेल्या गॅरेज मध्ये या गाड्या दुरुस्त करता येत नाही.

त्यावर उपाय शोधत छत्रपती संभाजीनगर शहरातील वैभव कराड आणि गितेश माळी या दोन तरुणांनी इलेक्ट्रीक दुचाकी, रिक्षा दुरुस्तीसाठी ‘ओपन एअर सोल्युशन’ नावाने स्टार्ट अप तसेच ईव्ही गॅरेज सुरु केले आहे.

Electric vehicle
Mumbai : गजब कारभार! नगरपालिकेतील फाईल्सचा रुग्णवाहिकेतून प्रवास; अंबरनाथ नगरपालिकेतील प्रकार

अडचणींचा केला अभ्यास

वैभव कराड याचे छत्रपती संभाजीनगर शहरातील एमआयटी अभियांत्रिक महाविद्यालयातून बीई झाले तर गितेश माळी याचे एमबीएचे शिक्षण सुरु आहे. सन २०१० पासून तर आतापर्यंत भरपुर इलेक्ट्रीक दुचाकी, रिक्षा विक्री झाल्याचे त्यांनी पाहिले. सुरुवातीच्या काळात यात लो स्पीडच्या चायनीज कंपोनंट असलेल्या अनेक गाड्या विक्री झाल्या होत्या. त्याचे बहुतांश पार्ट चायनीज होते.

अनेक ठिकाणी नवीन शो रुम सुरु झाल्याने बहुतांश जणांनी दुचाकी घेतल्या. दुचाकी घेणाऱ्यांना काही महिन्यानंतर कळाले की त्यात अनेक अडचणी आहे. गाड्यांची वारंटी होती मात्र ज्या शो रुम मधून गाड्या घेतल्या त्यातील काही शो रुम बंद पडले. तसेच वारंटी असली तरी गाडी कुठे घेऊन जायची, ती दुरुस्ती कशी करायची याची माहिती अनेकांनी नव्हती. नार्मल गॅरेज चालकांकडे ईलेक्ट्रीक गाडी दुरुस्त करता येत नाही.

त्यामुळे ईलेक्ट्रीक व्हेईकल असणाऱ्यांची अडचणी होती. यामध्ये वैभव आणि गितेश हे सन २०१८ दुचाकी चालकांच्या समस्यांचा अभ्यास करत होते. इलेक्ट्रीक गाड्या तर विक्री झाल्या मात्र त्या दुरुस्त करण्यासाठी कुठे सर्व्हीस सेंटर नसल्याचे त्यांच्या अभ्यासातून लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सन २०२० मध्ये ‘ओपन एअर सोल्युशन’ नावाने इलेक्ट्रीक गाड्या दुरुस्त करण्याचे स्टार्ट अप सुरु केले.

Electric vehicle
Landslides Alert: पुढील ४८ तास महत्त्वाचे, 'माळीण'सारखी घटना घडण्याची भीती, राज्यातील 'या जिल्ह्यांना धोका

इलेक्ट्रीक गाड्यात वर्षभरानंतर अनेक समस्या

इलेक्ट्रीक गाडी घेतल्यानंतर वर्षभरातनंतर त्यात कंट्रोलर फेल, बॅटरी, बीएमएस फेल्युलर, चार्जर जळणे, मोटार प्रॉब्लेम, वॉटर डायमेट, सेन्सर, रिवाइंडीय, आगीच्या अनेक अशा समस्या निर्माण होतात. कित्येक जणांच्या गाड्यांची वारंटी संपल्याने त्यांना गाडी दुरुस्तीसाठी अडचणींचा सामना करावा लागतो.

त्यातच कोरोनानंतर इलेक्ट्रीक दुचाकींची विक्री वाढली आहे. तसेच या अगोदर लो स्पीड गाड्यांची मोठ संख्येने झाली. या गाड्या तर अनेकदा नादुरुस्त होतात. त्यामुळे वैभव आणि गितेश यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील त्रिमुर्ती चौकात ‘ओपन एअर सोल्युशन’ नावाने स्टार्ट अप सुरु केले आहे. येथे कंपोनंट लेव्हला रिपेअर तसेच डेली सर्व्हीस देतात.

कंट्रोलरचा सर्वाधिक प्रॉब्लेम

सध्या इलेक्ट्रीक गाड्यांमध्ये कंट्रोलरचा सर्वाधिक प्रॉब्लेम असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. येथील तापमानाचा अभ्यास न केल्याने त्यात अडचणी येतात. पावसाळ्यात यात वॉटर डॅमेज होत असतो. त्यामुळे भविष्यातील यातील संधी बघून गितेश आणि वैभव यांनी राज्यातील शंभर व्हेंडर, डिलर्स सोबत गाड्या दुरुस्तीसाठी टायअप केले आहे.

यातून त्यांच्याकडे गाड्यांचे अनेक इलेक्ट्रीक पार्ट दुरुस्तीसाठी येतात. तसेच महिन्याला जवळपास २०० पेक्षा जास्त दुचाकी चालक त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी येत आहे. शक्यतो ८० ते ९० टक्के इलेक्ट्रीक पार्ट हे दुरुस्त करता येणे शक्य आहे. आता आपल्या स्टार्टअपचा विस्तार करण्यासाठी ते फ्रन्चाइजी मॉडेल आणणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.