- अशोक चांगले
सुखापुरी - अंबड तालुक्यातील सुखापुरी लगत असलेल्या लखमापूरी येथील दैनिक सामनाचे पत्रकार विष्णू श्रीरंग भापकर (वय-४४) यांनी आजारपण व आर्थिक विवंचनेतून राहत्या घरी १९ ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी १२.०० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. विष्णू भापकर यांना ३ एकर जमीन असून ते अल्पभूधारक आहे.