Maratha Reservation : बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे मायभूमीत यायला उशीर ; बीड जिल्ह्यात पदयात्रेचा पहिला मुक्काम

मुंबईला उपोषणासाठी निघालेले बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे शनिवारी (ता. २०) जिल्ह्यात उत्स्फूर्त स्वागत झाले. निर्धारित वेळेच्या सहा तास ही यात्रा उशिरा आली. पण, तोपर्यंत हजारो समाजबांधव हार घेऊन वाट पाहत थांबून होते.
beed
beedsakal
Updated on

गेवराई/शिरूर कासार : मुंबईला उपोषणासाठी निघालेले बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे शनिवारी (ता. २०) जिल्ह्यात उत्स्फूर्त स्वागत झाले. निर्धारित वेळेच्या सहा तास ही यात्रा उशिरा आली. पण, तोपर्यंत हजारो समाजबांधव हार घेऊन वाट पाहत थांबून होते.

beed
Maratha Reservation : सगळे काम बाजूला, आता फक्त आरक्षण ; महिनाभराचा शिधा घेऊन हजारो समाज बांधव निघाले मुंबईला

गेवराई येथे यात्रा पोचण्याची वेळ दुपारी बाराची होती. पण, रस्त्यातील गावागावांत होत असलेल्या स्वागतामुळे ही यात्रा सायंकाळी साडेपाच वाजता गेवराईत पोचली. गेवराईत ५१ जेसीबींतून २० क्विंटल फुलांची मनोज जरांगे यांच्यावर उधळण करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने आणि समाज बांधवांची मोठी गर्दी होती. यानंतर ही यात्रा रात्री उशिरा गढी, पाडळशिंगी मार्गे मातोरीला पोचली. दरम्यान, पोलिस प्रशासनाने झेंडे लाऊ नयेत, ट्रॅक्टर सोबत नेऊ नये, अशा नोटिसा बजावल्या होत्या. तरीही विविध गावांतून ट्रॅक्टरच्या दिंड्या काढून समाज बांधवांनी या यात्रेत सहभाग घेतला.

महिलांचाही सहभाग लक्षणीय

या पदयात्रेत जिल्ह्यातील महिलांनीही उत्स्फूर्त भाग घेतला. जागोजागी महिलांनी स्वागत करीत स्वत: सहभागी झाल्या. काही ठिकाणी महिलांनी फुगडी, लेझीमचे डाव खेळले.

जिल्ह्यात चोख बंदोबस्त

मराठा आरक्षण आंदोलन आणि काही महिन्यांपूर्वी झालेल्या जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने चोख नियोजन केले होते. मातोरीत दहा हजार स्वयंसेवक व ५०० पोलिसांचा फौज फाटा तैनात होता.

मायभूमीत जणू दिवाळीच

ही यात्रा जरांगे यांचे जन्मगाव मातोरी येथे मुक्कामी होती. या गावात महिलांनी दारासमोर सडा-रांगोळी काढून स्वागताची तयारी केली. रात्री नऊ वाजता पोचणाऱ्या यात्रेला उशीर होणार याची माहिती असूनही लोकांमधील उत्साह कायम होता. मातोरीत स्वयंसेवक व ग्रामस्थांनी हजारो नागरिकांच्या जेवणाची आणि पाण्याची चोख व्यवस्था केली होती. यासाठी चार ठिकाणी मंडप लावण्यात आले होते. आष्टी, पाटोदा, शिरूर, पाथर्डी, शेवगाव, गेवराई या ठिकाणाहून जेवण व्यवस्थेचे साहित्य दिवसभर या ठिकाणी येत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.