जातेगाव : अतिवृष्टी अन् गोदावरी नदीला पूर परिस्थितीत येताच, गेवराई तालुक्यातील गोदा काठच्या ३२ गावातील ग्रामस्थांत धडकी भरते. पूर परिस्थितीचे चित्र दिसताच नागरिकांची झोप उडत असून, प्रशासनाच्या दरबारात या गावांच्या पुनर्वसनाचे भीजत घोंगडे कायमच आहे..अतिवृष्टी अन् गोदावरी नदीला पूर असे चित्र येताच नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांच्या अडचणी वाढतात. गेवराईतील ३२ गावे ही नदीपात्राच्या नजीक येतात. नदीला पाणी येताच शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. २००५-०६ या वर्षी गोदावरीला जवळपास दोन ते अडीच लाख क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यामुळे बहुतेक गावांना पाण्याच्या वेढा पडला होता. सुरक्षेसाठी ग्रामस्थांचे स्थलांतर करावे लागले होते..यावेळी अतिवृष्टीने शेतीचे नुकसान तर काही ठिकाणी घराची पडझड झालेली आहे. जायकवाडी धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने या पाण्याचा गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येतो. नदीपात्रात पाणी सोडताच गेवराई तालुक्यातील ३२ गावातील ग्रामस्थांची झोप उडते. गोदावरी नदीच्या काठावरील या पूररेषेतील गावांचे पुर्नवसनाचे प्रशासनाकडून भीजत घोंगडे कायम आहे..या गावांना धोकाआगर नांदूर, संगम जळगाव, हिंगणगाव, गोंदी खुर्द, कटचिंचोली, पांगुळगाव, सुरळेगाव, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, म्हाळसपिंपळगाव, सावळेश्वर, खामगाव, राजापुर, गंगावाडी, काठोडा, नागझरी, राहेरी, बोरगाव थडी, पांढरी, भोगलगाव, मिरगाव, तपेनिमगाव, ढालेगाव, श्रीपत अंतरवाला, रामपुरी, गोपत पिंपळगाव, मनुबाई जवळा, ढालेगाव, गुळज (भगवान नगर), पाथरवाला बुद्रुक, पाथरवाला खुर्द, गुंतेगाव आणि बोरगाव बुद्रुक या गावांना पुरस्थितीचा फटका बसतो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.