Latest Pachod News: अज्ञात चोरट्यांनी धूमाकुळ घालत घराच्या कडी - कोयंडा तोडून एकाच रात्री चार ठिकाणी चोऱ्या करून घरातील त्रेसष्ट हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना हर्षी बु (ता.पैठण) येथे मंगळवारी (ता.एक) मध्यरात्री घडली असून दोन दिवस चोरट्यांनी या गावांस 'लक्ष्य' बनवून जवळपास दोन दिवसांत दहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात धास्तीचे वातावरण पसरले असून रात्रीला पोलीसांनी गस्त घालण्याची परिसरातून मागणी होत आहे.
यासंबंधी अधिक माहिती अशी, हर्षी येथील आबासाहेब मुरलीधर आगळे हे सोमवारी (ता.३०) दिवसभर आपले शेतातील कामे करून सायंकाळी कुटुंबियासोबत जेवण उरकून झोपी गेले. मध्यराञी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून घरातील सामानाची तपासणी करीत घरातील बॅगेत ठेवलेली कपाटाची चावी शोधली व कपाट उघडून त्यातील कपडे व इतर साहित्याची ढुंढाळणी करून त्यात ठेवलेले.