Osmanabad Crime | कळंबमध्ये धाडसी चोरी; दोन एटीएम फोडून २१ लाखांची चोरी

दोन एटीएम फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
Osmanabad Crime News
Osmanabad Crime Newsesakal
Updated on

कळंब (जि.उस्मानाबाद) : गॅस कटरच्या साहाय्याने एटीएमच्या दोन मशीन कापून त्यातील अंदाजे २१ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरली आहे. ही घटना मंगळवार (ता.२२) पहाटे अडीच वाजता शहरातील ढोकी रस्त्यारील एका हॉस्पिटल जवळच्या बँक ऑफ इंडिया व ढोकी नाक्यावरील हिताची कंपनीच्या एटीएम (ATM) केंद्रामध्ये घडली. शहरात प्रथमच धाडसी चोऱ्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेतील दोन चोरट्यांनी तोंडाला पूर्ण मास्क घालून मशीन फोडल्या असून त्यांनी आलिशान गाडी घटनास्थळी उभी केल्याची माहिती समोर येत आहे. यात गॅस कटर ही चोरीचे वापरल्याने चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. कळंब (Kalamb) शहरात मंगळवारच्या मध्यरात्री तीन चोऱ्याच्या घटना घडल्या आहेत.(Theft Incident In Kalamb, 21 Lakh Stolen Through Two ATM In Osmanabad News)

Osmanabad Crime News
Honda Activa ठरली देशातील सर्वोत्तम स्कूटर, ३० दिवसांत सव्वा लाखांची विक्री

दोन एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने फोडून अंदाजे २१ लाख रुपये चोरल्याची घटना घडली आहे. तर एका कारखान्यातून गॅस कटर चोरल्याची घटना घडली आहे. एका रात्रीतून दोन एटीएम फोडल्याने शहरात (Osmanabad) खळबळ उडाली आहे. या सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. पोलिसांनी तत्काळ ठसे तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. चोरट्यांनी चोरी करून गेल्यानंतर बोट किंवा हाताचे ठसे उमटू नये, यासाठी फवारणी केल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात मागच्या काही महिन्यांपासून धाडसी दरोड्यासह चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. मंगळवारी पहाटे अडीच वाजताच्या दरम्यान शहरातील ढोकी रोड परिसरातील बँक ऑफ इंडिया आणि हिताची कंपनीचे दोन एटीएम मशीन चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने कापून पैसे घेऊन पसार झाले आहेत. विशेष म्हणजे हा सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. अशात पोलिसांची गस्त सुरू असताना देखील चोरांनी ही धाडसी चोरी केली आहे. पहाटे २ वाजून २८ मिनिटांच्या सुमारास दोन चोरांनी ढोकी नाका परिसरातील हिताची कंपनीच्या एटीएममध्ये केंद्र उघडून प्रवेश केला. आत आल्यानंतर त्यांनी ते लावून घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्याकडील असलेल्या गॅस कटरने मशीनच्या पैसे असलेला भाग कापून काढला व त्यातून तब्बल साडेतीन लाख रुपये काढून पसार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Osmanabad Crime News
Aurangabad : औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर कारच्या धडकेत बापलेक गंभीर जखमी

बँक ऑफ इंडियाचाही एटीएम फोडून लाखो रुपये पळवले

दरम्यान ढोकी रस्त्यावरील एका हॉस्पिटल शेजारी असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये काही चोरांनी प्रवेश केला आणि हिताचीच्या एटीएमप्रमाणे ही देखील मशीन गॅस कटरने कापून अंदाजे १८ लाख रुपये घेऊन पसार झाल्याची माहिती मिळतेय. ३ वाजून १४ मिनिटाला शहरातील ढोकी-परळी वळण रस्त्यावरील नरसिंह ट्रेलर्स कारखान्यातील गॅस कटर चोरीला गेल्याची देखील घटना घडली आहे. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे

घटनास्थळी पोलीस दाखल

पहाटे परिसरातील आजूबाजूला असणाऱ्या दुकानदारांना एटीएम फोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना संपर्क केला. सहायक पोलीस अधीक्षक एम.रमेश, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. चोरी करण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटर चोरले, तोंडाला पूर्णपणे मास्क वापरले, आलिशान गाडीही चोरट्यांनी घटनास्थळी उभी केली. शिवाय एटीएम फोडताना पोलिसांच्या हाती कुठलाच पुरावा लागू नये. यासाठी हाताचे किंवा बोटाचे ठसे उमटू नये यासाठी करण्यात आलेली फवारणी यामुळे चोरट्यांचा शोध घेणे पोलिसापुढे मोठे आव्हान असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.