Video : कोरोनाचा धोका नाही, फक्त खबरदारी घ्यावी : डॉ. मान्नीकर

Nanded News
Nanded News
Updated on

नांदेड : कोरोना विषाणुवर मात करावयाची असेल तर खबरदारी घेणेच महत्त्वाचे आहे. कोरोना व्हायरस उडत नाही. तो निर्जिव आहे. खोकला तसेच थुंकीच्या माध्यमातून हा संसर्ग होतो. त्यामुळे एकमेकांशी बोलताना दोन हात दूर रहावे. तसेच हस्तांदोलन करू नका. चुकूनही मास्क वापरू नका. कारण मास्कवर मोठ्या प्रमाणावर जंतू बसलेले असतात, त्यातून धोका होऊ शकतो, असे मत नांदेड येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अरुण मान्नीकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. 

स्वतःसह कुटुंबाची काळजी आवश्‍यक
कोरोना विषाणुने सध्या जगभरात थैमान घातले आहे. परिणामी कोरोनाने संपूर्णच जनजीवन विस्कळित झाले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासन दिवसरात्र जीव ओतून आपले कर्तव्यबजावत आहेत. शासनही जनतेला सुरक्षित राहण्यासाठी घरीच राहण्याचे आवाहन करीत आहे. मात्र, जनता काही या आवाहनाला न जुमानता विनाकारण बहाणे करून रस्त्याने फिरत आहेत. त्यामुळे लोकांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखून घरीच बसून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. अरुण मान्नीकर यांनी व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून केले आहे.  

तुम्ही फक्त एवढे करा

  1. विनाकारण घराबाहेर पडू नका व कुणाला बाहेर देखी जाऊ देऊ नका.
  2. दर दोन तासांनी आपले हात सॅनिटायझरऐवजी साबणाने स्वच्छ धुवा.
  3. शक्यतो मास्क वापरू नका. कारण त्यातून जास्त धोका आहे. 
  4. घरी गेल्यावर गरम पाण्याने गुळण्या केल्यास घशात अडकलेले जंतू नष्ट होतील.

अत्यावश्‍यक असेल तरच घराबाहेर पडा 
सद्यस्थितीत महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसागणीस वाढ होत असून, काही बरेही होत आहेत. हा आकडा कमी करण्यासाठी शासनस्तरावर तसेच आरोग्य, पोलिस विभाग  सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी तसेच पोलिस व जिल्हा प्रशासन आपल्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असल्याने काहीप्रमाणात यश देखील येत आहे. मात्र, काहीजण विनाकारण शोकाने फेरफटका मारत असून, स्वतःसोबतच दुसऱ्यांच्या जीवाला घोर लावत असून, यात युवकांची संख्या सर्वाधिक पहायला मिळत आहे.

सोशल डिस्टन्स पाळणे आवश्‍यक  
कोरोना (कोविड-१९) हा विषाणू अतिशय भयानक असला तरी, तो कुणाकडे चालून येत नाही. या विषाणूच्या संपर्कात जोपर्यंत व्यक्ती येत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीला या विषाणूची लागण होणार नाही. त्यामुळे शासन लोकांना वारंवार घराच्या बाहेर न निघण्याची विनंती करीत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. तसेच आपण तर विनाकारण घराबाहेर तर निघूच नये, आपल्या आजूबाजूच्यांनाही घराबाहेर जाण्याचे टाळण्यास सांगावे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.