महिला सुरक्षेसाठी `ह्या’ आहेत पोलिसांच्या उपाययोजना

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : महिलांवर होणारे अत्याचार व मुलींचे होत असलेले अपहरण छेडछाड व प्रेम प्रकरणातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर होत असलेले प्राणघातक हल्ले लक्षात घेऊन अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. या संदर्भात त्यांनी चर्चासत्र घेऊन महिलांना सुरक्षेसंदर्भात अस्वस्थ केले. महिलांवर होणारे अत्याचार व त्यावरील उपाय योजना संबंधी यांनी उपस्थित सर्व महिलांना विशेष मार्गदर्शन व माहिती दिली.

दामिनी पथक

शहरात गर्दीचे ठिकाणी, महाविद्यालय व खाजगी शिकवणीच्या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिलांची होणारी छेडछाड रोखणे हा या पथकाच्या स्थापनेमागचा उद्देश आहे. दामिनी पथकाने शहरातील महाविद्यालय व खाजगी शिकवण्याचे ठिकाणी भेटी देऊन महिला व मुलींच्या छेडछाडीचे प्रतिबंध करून संबंधितावर परिणामकारक कार्यवाही करण्याच्या सूचना या पथकाला दिलेल्या आहेत.

पोलीस दिदी व पोलीस काका पथक 

जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन स्तरावर पोलीस दिदी व पोलीस काका पथक स्थापन करण्यात आलेले असून सदर पथकात महिला पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. महिला पोलीस कर्मचारी यांचे पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा, महाविद्यालय व खाजगी शिकवणीच्या ठिकाणी जाऊन त्यांना महिला व मुलां- मुलीवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पोलिस दलातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची व कायद्याची इत्यंभूत माहिती देण्यासाठी व होणाऱ्या अत्याचारावर प्रतिबंध घालण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. व परिसरात मुलीवर होणाऱ्या अपराधासंबंधी स्वरक्षण व सुरक्षाविषयी मार्गदर्शन शाळेतील मुला- मुलींना गुड टच बॅड टच अनुषंगाने माहिती देणे व लैंगिक अत्याचाराचे गुन्हे व त्यावरील उपाययोजना याबाबत माहिती दिली. 

पोलिस मोबाईल पथक
 
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, बँका, पोस्ट ऑफिस, बसस्थानक रेल्वेस्थानक, कॉलनी व गर्दीची ठिकाणे यांना सतत भेटी देऊन दिलेल्या कालावधीत गस्त घालत राहतील. व पेट्रोलिंग केल्यानंतर त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी चौकातील दर्शनी भागात हे पथक उभे राहील. 

महिला दंगा नियंत्रण पथक 

शहरातील छेडछाडीच्या घटनेस आळा घालण्यासाठी व महिलांना जलद प्रतिसाद मिळण्यासाठी दहा महिलांचे एक पथक तयार करण्यात आलेले आहे. हे पथक शहरात शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, बँका, पोस्ट ऑफिस, बसस्थानक, रेल्वेस्थानक आधी गर्दीच्या ठिकाणी गस्त घालून छेडछाडीच्या घटना व नियंत्रण मिळवितील.

जिल्हा महिला सुरक्षा पथक 

या पथकामध्ये महिलावर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये योग्य मार्गदर्शन करणे. त्यांचे कौटुंबिक हिंसाचाराबाबत समायोजन करून त्यांना वेळीच न्याय मिळवून देण्यासाठी हे पथक काम करते. 

महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक- १०९१

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत व त्याची माहिती देण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक १०९१ सुरू करण्यात आला आहे. अत्याचाराची माहिती महिलांनी या क्रमांकावर द्यावी व तसेच चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व त्यांना योग्य वेळी व तात्काळ मदत मिळणे कामी चाईल्ड हेल्पलाईन 1098 सुरू असून होणाऱ्या अत्याचाराची माहिती या क्रमांकावर द्यावी.

यांची होती उपस्थिती

या चर्चासत्रामध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कोलते, पोलीस उपनिरीक्षक अनिता दिनकर, गोदावरी बँकेच्या संचालिका राजश्री पाटील, ॲड. दीपा बियाणी, धनश्री देव, शीला नाईकवाडे, सुरेखा पाटील, संध्या राठोड, डॉ. विद्या पाटील, कल्पना पाटील डोंगळीकर, प्रतिमा बंडेवार, डॉ. सत्यभामा जाधव, सुनिता बाहेती यांच्यासह जवळपास दीडशेहून अधिक महिला व महिला पोलिस कर्मचारी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.