Asegaon crime : आसेगाव शिवारात मोबाईल व्यावसायिकाची दुचाकी चोरट्यांनी आडवली....मारहाण करुन ९६ हजारांचा ऐवज केला लंपास...

Asegaon crime : आसेगाव शिवारात मोबाईल व्यावसायिकावर चोरट्यांनी हल्ला करून ९६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्या शोधात सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे.
Asegaon crime
Asegaon crime sakal
Updated on

वसमत : वसमत नांदेड रोडवरील आसेगाव शिवारात अज्ञात चोरट्यांनी वसमत येथील मोबाईल व्यावसायिकाची दुचाकी आडवून मारहाण करीत मोबाईल साहित्य व रोख रक्कम मिळून ९६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी ता.१९ रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

दरम्यान मोबाईल व्यावसायिकाने उपचार घेत असल्याने शुक्रवार ता.२० उशीरा तक्रार दिल्याने ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरा अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल. या रस्त्यावर प्रवाशासोबत वारंवार घटना घडत असल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन‌ पाहणी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत शहरातील मोबाईल व्यावसायिक असलेले कैलास कदम हे गुरुवारी ता.१९ नांदेड येथे मोबाईल साहित्य व दुरुस्तीचे मोबाईल आणण्यासाठी नांदेड येथे गेले होते. या कामात त्यांना रात्री उशीर झाला. मोबाईल साहित्य घेऊन वसमतकडे परतीच्या मार्गावर असताना वसमत तालुक्यातील आसेगाव शिवारातील पुलाजवळ त्यांची दुचाकी आली असता दुसर्या दुचाकीवरील तोंडे बांधलेले तिघा जणांनी दुचाकी आडवी लावून थांबवले व मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच तलवार व चाकुचा धाक दाखवत जवळची रोख रक्कम, सोन्याचे दागीणे व मोबाईल साहित्य घेऊन पळ काढला. जवळपास ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला.‌ चोरट्यांच्या मारहाणीत दुखापत झाल्याने कैलास कदम यांनी प्रथम रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर शुक्रवार ता.२० रात्री ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरुन तीन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष मुपडे, विजय उपरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन संशयीत आढळले असून त्यांच्या मुस्क्या आवळण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना केले आहे. दरम्यान रात्री ११ वाजता हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी ग्रामीण पोलीस ठाणे व घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.