Kalamb Crime News : चोरट्यांकडून मायलेकिस जबर मारहाण करत ४१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळविले

माराच्या भितीपोटी गळ्यातील सहा ग्रॅम सोन्याचे मणी असलेली माळ व घरातील ५ हजार रूपये रोख रक्कम तीन चोरट्याना दिले.एकाने दोन ग्रॅम सोन्याचे कानातील फुले काढुन घेतले.
thieves beat up mother - daughter and stole gold jewelery worth 41 thousand rupees crime kalamb
thieves beat up mother - daughter and stole gold jewelery worth 41 thousand rupees crime kalambesakal
Updated on

कळंब : शहरातील बाबानगर येथे मायलेकीना अज्ञात तीन चोरट्यांनी बेदम मारहाण करून अंगावरील ४१ हजार किमतीचे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना सोमवार (ता.१३) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान याप्रकरणी कळंब पोलिसात रात्री तीन चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर येथील गीता मनोज यादव (वय-३५) शहरातील बबानगर येथे राहत असलेल्या आई इंद्राबाई वाघमारे याना भेटण्यासाठी १० दिवसापूर्वी त्या आल्या होत्या.

रविवार ता.१२ रात्री दोघी मिळून जेवन करुन घरी झोपलो होते.मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी घराच्या दरवाज्याला जोराने ठोठावले. अवाज आल्याने इंद्राबाई वाघमारे या झोपेतून जागे होऊन मुलगी गीता याना उठविले.

त्यावेळी घराच्या दरवाज्याची कडी तोडुन तीन अनोळखी व्यक्ती तोंडाला बांधलेले घरात घुसले. तिन पैकी एकाने इंद्राबाई याना घरातील पैसे व गळ्यातील, कानातील सोन्याचे दागिने काढुन दे असे म्हणत काठीने डोक्यात मारले व दोन्ही हातावर काठीने मारुन जखमी केले.

माराच्या भितीपोटी गळ्यातील सहा ग्रॅम सोन्याचे मणी असलेली माळ व घरातील ५ हजार रूपये रोख रक्कम तीन चोरट्याना दिले.एकाने दोन ग्रॅम सोन्याचे कानातील फुले काढुन घेतले.त्यानंतर गीता यांच्या डोक्यात चोरट्याने काठीने मारुन जबरदस्तीने गळ्यातील सहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या सेवनपिस व डाव्या हातातील दोन ग्रॅम सोन्याची अंगठी काढुन घेतली.

मायलेकीस काठीने डोकीत हातावर मारुन दुखापत करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेवुन निघुन गेले.भीतीपोटी या मायलेकी घरात बसून होत्या.सोमवार ता.१३ घडलेल्या प्रकारची माहिती मोठी बहीण हिरा राऊत याना फोनव्दारे सकाळी दिली.

डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.पुढील उपचारासाठी त्या मायलेकीना धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.याप्रकरणी कळंब पोलिसात अज्ञात तीन चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.