औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : येथील उपबाजार समितीमधील अज्ञात चोरट्यांनी चार दुकानांचे शटर तोडून दुकानांमधील १९ हजारांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना शुक्रवारी (ता.२९) पहाटे घडली. या बाबत माहिती अशी की, येथील उपबाजार समितीमधील नागनाथ तम्मेवार यांच्या नागनाथ ट्रेडिंग कंपनी दुकानातील दोन हजार रुपये रोख रक्कम, तर सुरेश शिंदे यांचे रोकडेश्वर कृषी केंद्र (Crime In Hingoli) यांच्या दुकानातील १७ हजार रुपये रोख रक्कम असे १९ हजार रुपये लंपास केले. तर बबन शिंदे यांचे माँ कृष्णाई हार्डवेअर व इतर एक दुकान चोरट्यानी फोडले. मात्र येथे चोरट्याच्या हाती काही लागले नाही. चार दुकाने फोडून १९ हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. घटनेची माहिती व्यापाऱ्यांनी (Aundha Nagnath) पोलीस स्टेशनला दिल्यानंतर घटनास्थळी पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल लांडगे, पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा वाळके यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी व्यापाऱ्यांनी घटनेची तक्रार पोलिसांमध्ये दिली असल्याची माहिती नागनाथ ट्रेडिंग कंपनीचे मालक नागनाथ तम्मेवार यांनी सांगितले. सदरील घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून चार चोरटे दिसत आहेत. या वेळी नागनाथ तम्मेवार, बबन शिंदे, श्रीराम राठी, सचिन दंतवार संजय पाठक, सुरेश शिंदे, बाळासाहेब शिंदे, रामु राठी हे व्यापारी उपस्थित होते. या उपबाजार समितीमध्ये एकूण ४३ गाळे असून १५ व्यापारी त्या गाळ्यात आपला व्यापार करतात उपबाजार समितीकडून दुकानाला संरक्षण भिंत व लाईटची व्यवस्था केली नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. वारंवार अशा घटना घडत असल्याने व्यापारी नाराज आहेत. दुकानांना सरंक्षण भिंत, लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था व वाॅचमनची व्यवस्था करून देण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.