उजनी (जि.लातूर) : तीन चोरट्यांनी येथील एका शेतकऱ्याचे सोयाबीन चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (ता.१९) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान शेतकऱ्याला वेळीच जाग आल्याने चोरट्यांचा सोयाबीन चोरण्याचा डाव तर फसला. मात्र त्यांनी हातोड्याने केलेल्या मारहाणीत शेतकरी (Farmer) गंभीर जखमी झाला आहे. शेतकऱ्याचे गोल्डन बिन समजले जाणाऱ्या सोयाबीनवर आता चोरट्यांचा डोळा असल्याचे दिसत आहे. बाजारपेठेत सोयाबीनला वाढीव दर मिळण्याच्या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी अद्यापही सोयाबीन (Soybean) मालाची विक्री केली नाही. त्यामुळे प्रत्येकांनी सोयीनुसार शेतातील शेडवर किंवा घरी सोयाबीन मालाची साठवणूक केली आहे. उजनी (ता.औसा) येथील सुदाम ढवण हे बुधवारी रात्री आपल्या शेतातील शेडमध्ये झोपले होते. (Thieves Brutally Beaten Farmer, Soybean Stealing Attempt Failed In Ujani Of Latur)
रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी पत्रा काढून आतून दरवाजाचा कडी-कोयंडा काढला व आत प्रवेश केला. त्याचवेळी ढवण यांना काहीतरी वाजण्याच्या आवाजाने जाग झाली. त्यावेळी त्यांना तोंडाला बांधलेले तीन अज्ञात व्यक्ती त्यांच्या समोर दिसले. यावेळी चोरट्यानी ढवण यांना शांत बसण्याची धमकी दिली. परंतु त्यांनी मोठ्या आवाजात ओरडल्याने चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात हातोड्याने वार केला आणि तिथून पळ काढला. यामुळे ढवण यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत त्यांनी त्यांच्या मुलास फोन करून बोलावून घेतले. ढवण यांच्यावर येथील खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. (Latur Crime)
दरम्यान सोयाबीन चोरण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने विकले तरी नुकसान आणि ठेवले तरी नुकसान. त्यामुळे 'इकडे आड तिकडे विहीर' अशी काहीशी शेतकऱ्यांची स्थिती झाल्याचे पाहायला मिळत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.