Marathwada News : पाणी नसलेल्या शेततळ्यातील पन्नीवर चोरांनी मारला डल्ला

देवगाव येथील थापटीतांडा- ब्राम्हणगाव रस्त्या लगतची घटना
Marathwada News : पाणी नसलेल्या शेततळ्यातील पन्नीवर चोरांनी मारला डल्ला
Marathwada NewsESakal
Updated on

आडुळ : सध्या देवगाव सह पैठण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने येथील नागरीकांसह शेतकरयांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन "धरण उशाला व कोरड घशाला" अशी परिस्थिती असल्याने येथील अनेक शेतकरी यांनी आपापल्या ऐपतीनुसार शेततळे करुन पावसाळ्यात त्याला भरुन उन्हाळ्यात त्यातील साठवुन ठेवलेल्या पाण्यावर शेती करतात त्यामुळे देवगाव येथील अनेक शेतकरी यांनी आपल्या शेतात शेतीतळी करुन त्यात पन्नी टाकली आहे.

Marathwada News : पाणी नसलेल्या शेततळ्यातील पन्नीवर चोरांनी मारला डल्ला
Nashik Crime News : पेठ रोडवर समाजकंटकांकडून वाहनांची तोडफोड

बबनराव श्रीपतराव गिते यांची देवगाव शिवारातील ब्राम्हणगाव - थापटी तांडा रस्त्या लगत गट क्रमांक ५६ मध्ये ८ एकर शेत जमीन असुन त्यांना यंदा मोसंबी व डाळींब ची फळबाग लावायची असल्याने त्यांनी शेततळे केले होते. माञ यंदा चांगला पाऊस झाला नसल्याने त्यांचे शेततळे पुर्ण क्षमतेने भरले नव्हते त्यामुळे सद्यस्थितीला त्यात फक्त एक ते दोन फुटच पाणी होते याच संधीचा फायदा घेत अज्ञात चाेरट्यांनी शेततळ्यात असलेली पन्नी तळापासुन कापुन घेवुन पोबारा केला. बुधवारी (ता.२२) रोजी जेव्हा बबनराव गिते हे शेतात गेले असता त्यांच्या हि बाब लक्षात आली. या बाबत पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असुन पुढिल तपास पाचोड पोलीस करीत आहेत.

Marathwada News : पाणी नसलेल्या शेततळ्यातील पन्नीवर चोरांनी मारला डल्ला
Nashik Onion News: कांद्याचे दर ‘जैसे थे’मुळे आवक घटली! भाव दोन हजारांच्या खालीच, दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

अस्मानी व सुल्तानी संकटानंतर आता चोरट्यांनी ही शेतातील विद्युत मोटार, स्टाटर, शेती साहित्यासह आता चक्क शेततळ्यातील पन्नीवरच डल्ला मारीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

माझे ३५×३५×३ चे शेततळे असुन यात पन्नी टाकण्यासाठी दोन ते आडीच लाख रुपये खर्च आला माञ चोरट्या तळातील पन्नी सोडुन वरची सर्व पन्नी चोरुन पसार झाले.

- बबनराव गिते (शेतकरी,देवगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.