तिसऱ्या प्रयत्नात अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झळकला युपीएससीत

pangra shinde
pangra shinde
Updated on

हिंगोली ः वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील शेतकऱ्याचा मुलगा सुरेश शिंदे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. त्याने देशात ५७४ वा क्रमांक मिळविला आहे. मुलगा अधिकारी झाल्याचा आनंद आई - वडिलांना झाला आहे.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील सुरेश कैलासराव शिंदे यांचे शिक्षण पांगरा शिंदे येथील प्राथमिक शाळेत झाले. इयत्ता सातवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण झाल्यानंतर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण रोकडेश्वर विद्यालय पांगरा शिंदे येथे झाले. त्यानंतर त्यांनी नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली. सन २०१२ मध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम २०१५ साली पूर्ण केला. या अभ्यासक्रमात ८२ टक्के गुण मिळविले. 

आई-वडिलांनी दिले प्रोत्साहन 
आयटी सेक्टरमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर देखील आली. मात्र, अधिकारी त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी धुडकावली. २०१६ त्यांनी दिल्ली येथे जाऊन लोकसेवा आयोगाच्या तयारी सुरू केली. मुलगा अधिकारी होणार या आशेवर मागील १८ वर्षांपासून शेतात राहणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांनी सुरेश शिंदे यांना प्रोत्साहन दिले. आई - वडिलांचे कष्टाचे चीज व्हावे यासाठी त्यांनी करू अभ्यास केला. २०१७ मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची मात्र अपयश हा यशाचा पहिला लक्षात घेऊन त्याना नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. त्यानंतर या तिसऱ्या प्रयत्नात यश त्यांच्या पदरी पडले. 

आई - वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू 
निकाल जाहीर होताच त्यांनी गावी शेतात राहणाऱ्या आई - वडिलांना परीक्षा पास झाल्याची माहिती दिली. मात्र लोकसेवा आयोगाची परीक्षा काय आहे याची माहिती त्यांच्या आई - वडिलांना नाही. मात्र मुलगा मोठा अधिकारी झाला आहे हे कळलेल्या आई - वडिलांच्या डोळ्यातुन मात्र आनंदाच्या धारा वाहू लागल्या. सुरेश शिंदे यांनी देशात ५७४ वा क्रमांक मिळवला आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेतल्यानंतरही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले. विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय ठरवून त्यानुसार अभ्यास सुरू केल्यास यश निश्चितच मिळते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संपादन ः राजन मंगरुळकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.