Traffic Rule : ‘तिसऱ्या डोळ्या’चा तीस हजार वाहनांना दणका; ४३ दिवसांमध्ये ठोठावला दोन कोटी ८४ लाखांचा दंड

वाहनचालकांनी नियमांचे पालन करुन वाहने चालवली तर कुठेच अडचणी येणार नाही. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवितो.
Third Eye Fines 30000 Vehicles Collects 2 84 Crore in Fines in 43 Days traffic rule
Third Eye Fines 30000 Vehicles Collects 2 84 Crore in Fines in 43 Days traffic ruleSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाहनधारकांना शिस्त लागावी, यासाठी २६ जानेवारीपासून शहर पोलिस वाहतूक नियंत्रण शाखेने ऑटोमॅटिक नंबर टिपणारे कॅमेरे (एएनपीआर) कार्यान्वित केले आहेत. दहा मार्चपर्यंत कॅमेऱ्यांनी ३० हजार ६३० हजारांवर बेशिस्त वाहनचालकांना बरोब्बर टिपले.

त्यापोटी दोन कोटी ८४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. उपायुक्त नांदेडकर म्हणाले, की शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, वाहतुकीला अडथळा येऊ नये, यासाठी आमची यंत्रणा कायम तत्पर असते.

वाहनचालकांनी नियमांचे पालन करुन वाहने चालवली तर कुठेच अडचणी येणार नाही. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवितो. २६ जानेवारीपासून अॅटोमॅटिक नंबरप्लेट टिपणारे कॅमेरे कार्यान्वित केले. त्यातून नियम मोडणाऱ्या वाहनांवर दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात आली. ३० हजारांवर वाहनांना दंड ठोठावला, त्यात सर्वाधिक २१ हजार ८८६ वाहनधारक ट्रिपल सीट होते.

पूर्वी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी फोटो काढल्यानंतरच दंडाची पावती मिळत होती. मात्र, एएनपीआर यंत्रणेद्वारे चौकामध्ये वाहतूक पोलिस नसला तरीही नियम मोडणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनी शहरातील मुख्य चौक व परिसरात १२२ ऑटोमॅटिक नंबर टिपणारे कॅमेरे (एएनपीआर) बसविले आहेत.

राँगसाइड, स्टॉपलाइन ओलांडणाऱ्यांनाही दंड

एएनपीआर सिस्टीममध्ये ८,२५५ राँगसाईड आणि ३,३३२ वाहनधारकांवर स्टॉपलाइन ओलांडल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. शहरातील महत्त्वाच्या १७ जंक्शनवर १२२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नियम मोडणाऱ्या वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो काढून रजिस्टर मोबाईल नंबरवर दंडाची पावती पाठविली जाते, असे उपायुक्त नांदेडकर यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेला सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात, पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, अमोल देवकर, राजेश मयेकर, अशोक भंडारे आदींची उपस्थिती होती.

वाहनधारकांना ई-चालान देऊन दंडात्मक कारवाई करणे, हा एएनपीआर कॅमेऱ्यांचा उद्देश नाही, तर वाहतुकीला शिस्त लावणे हा मुख्य उद्देश आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास, वाहतूक कोंडी आणि अपघाताला आळा बसेल. वाहनमालकाला दोन वेळा दंडाची पावती मिळाल्यानंतर त्याचे वाहन जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत.

— शीलवंत नांदेडकर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.