सचखंड संगतसाहेब चौकियात्रेत हजारों भाविक सहभागी 

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : शहराच्या चौफाळा भागात असलेल्या ऐतिहासिक गुरुद्वारा श्री संगतसाहेब येथे रविवार (ता. दोन) रोजी वार्षिक चौकी यात्रा कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी दर्शन घेण्यासाठी आणि लंगर प्रसाद ग्रहण करण्यासाठी हजारोंच्या संख्येत भाविकांनी हजेरी लावली. 
दरवर्षी गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाच्या वतीने गुरुद्वारा संगतसाहेब येथे वार्षिक चौकी यात्रेचे आयोजन करण्यात येते. रविवारी सकाळी आठ वाजता तख्त सचखंड श्री हजुरसाहेब येथून अरदास उपरांत चौकी यात्रा काढण्यात आली. 

चौकी यात्रा गुरुद्वारा गेट नंबर एक येथून गेट क्रमांक सहा, गेट क्रमांक पाच शहिदपुरा येथून गुरुद्वारा गोबिंद बाग साहेब येथे पहिल्या टप्प्यावर पोहचली. येथे विविध कार्यक्रमानंतर चौकी यात्रा पुढे भगतसिंघजी मार्ग, बाफना, देगलूर नाका, चौफाळामार्गे गुरुद्वारा संगतसाहेब येथे पोहचली. यात्रेत निशानसाहेब, घोडे, कीर्तन जत्थे यांचाही समावेश होता. संगतसाहेब येथे यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. 
परंपरेनुसार गुरुद्वारात श्री गुरुग्रंथ साहेबाचे पठन, कीर्तन आणि कथा कार्यक्रम पार पडले.

मुख्य जत्थेदारांसह अन्य मान्यवरांची उपस्थिती

यावेळी गुरुद्वाराच्या जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, हेड ग्रंथीभाई काश्मिरसिंघजी, मीत ग्रंथीभाई अवतार सिंघजी शीतल, धुपियाभाई रामसिंघजी, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंदरसिंघ बुंगई, सदस्य गुरुचरणसिंघ घडीसाज, गुरमितसिंघ महाजन, जगबीरसिंघ शाहू, भागिन्दरसिंघ घडीसाज, गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा, प्रशासकीय अधिकारी डी.
पी. सिंघ चावला, कनिष्ठ अधीक्षक नारायणसिंघ नंबरदार, हरजीतसिंघ कडेवाले, रविंदरसिंघ कपूर, भाई परमवीरसिंघ रहरासिया, भाई जतींदरसिंघ, भाई सरबजितसिंघ निर्मले, भाई गुरमितसिंघ पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भव्य लंगरप्रसाद कार्यक्रम पार पडले. हजारोच्या संख्येत सर्वधर्मीय भाविकांनी लंगरप्रसादाचा लाभ घेतला. 

मुस्लिम बांधवांनी केले सत्कार
 
गुरुद्वारा संगतसाहेबची चौकी यात्रा देगलूर नाका भागातून जाते. रविवारी या चौकी यात्रेचे देगलूर नाका भागात माजी नगरसेवक आणि प्रतिष्ठित नागरिक श्री मसूद खान यांनी भव्य सत्कार केले. या वेळी त्यांच्या समवेत मोठ्या संख्येत मुस्लिम बांधव उपस्थित होते. पंजप्यारे भाई रामसिंघजी यांनी मसूदखान यांचे पुष्पहार आणि सिरेपाव देऊन सत्कार केले. 

अबचलनगर येथे स्वागत 

संगतसाहेब येथून परतीच्या वेळेस अबचलनगर येथील गुरुद्वारात चौकी यात्रेचे भव्य सत्कार करण्यात आले. भाविकांना शरबत आणि मिष्ठान्नाचे वाटप या वेळी करण्यात आले. अबचलनगर येथील नागरिकांनी आरती ओवाळून आणि पुष्पवृष्टी करून चौकी यात्रेचे स्वागत केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.