नांदेड : सगरोळी (ता. बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने रविवार (ता. नऊ) ते मंगळवार (ता. ११) दरम्यान कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन केले आहे. या तीन दिवसीय महोत्सवात कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, महिला मेळावा, पिक प्रात्याक्षिके, प्रक्षेत्र भेटी व विविध विषयांवरील चर्चासत्रांसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कुलगुरु डॉ. ढवण राहणार उपस्थित
रविवारी सकाळी अकरा वाजता परभणीच्या वसंतराव नाइक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवन यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी पशुसवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक डॉ. लखनसिंग, विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. श्री देवसरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, स्मार्टकेम टेक्नोलॉजीज लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष नरेश देशमुख, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेश धुर्वे, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. मधुसूदन रत्नपारखी, कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा रेशीम विकास अधिकारी डॉ. आरती वाकोरे, उपविभागीय कृषी अधिकारी माधव सोनटक्के, बाळासाहेब कदम, रविकुमार सुखदेव यांच्यासह कृषी उद्योग समूहाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या सत्रात दुग्ध उत्पादनातील संधी याविषयावर डॉ. धनंजय परकाळे तर खत व्यवस्थापनातील आधुनिक तंत्रज्ञान याविषयी नरेश देशमुख मार्गदर्शन करणार आहेत.
हेही वाचा.....लवकरच असा दिसेल माहूरगड...
महिला स्वयंसहायता गटांसाठी मिळणार माहिती
सोमवारी (ता. दहा) महिला स्वयंसहायता गटांसाठी नाबार्डच्या योजना याविषयी राजेश धुर्वे, सोलापूर येथील उद्योगवर्धनी चंद्रिका चव्हाण या उद्योगातून स्वावलंबन याविषयी तर दौंड येथील कामगार ते यशस्वी उद्योजिका अंबिका मसाले समूहाच्या संचालिका कमल परदेशी या यशस्वी वाटचालीचे कथन करणार आहेत. अभिनेत्री मेघना झूझाम यांच्या एकपात्री प्रयोगचे सादरीकरण होणार आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक नईम कुरेशी, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी एस. व्ही. शिंगणे, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक दीपक दहे उपस्थित राहणार आहेत .
हेही वाचलेच पाहिजे..... आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार...काय ते वाचलेच पाहिजे
सघन पेरू लागवड तंत्रज्ञानावर चर्चासत्र
मंगळवारी (ता. ११) सकाळी सघन पेरू लागवड तंत्रज्ञान याविषयावर व्हीएनआर रायपूरचे अनुप नागर व देगलूर येथील प्रगतशील शेतकरी अनिल पाटील तर बांबू लागवड व व्यवसायातील संधी याविषयी राष्ट्रीय बांबू अभियान समितीचे सदस्य संदीप ठेंग, कोल्हापूरचे प्रगतशील शेतकरी विनोद पाटील हे आपले अनुभव कथन करणार आहेत.
कांदा बिजोत्पादनावर मिळणार मार्गदर्शन
दुपारच्या सत्रात कांदा बिजोत्पादन व आधुनिक लागवड तंत्रज्ञानाविषयी जालना येथील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शेतकरी उद्धवराव खेडेकर तर गुजरात येथील अहेमदाबादचे शेंद्रीय शेतीतज्ञ भागतसी भाई हे प्रात्यक्षिकासह शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी महाराष्ट्र राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व उपवनसंरक्षण आशिष ठाकरे यांच्या उपस्थित कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
विविध कंपन्यांचे शंभरहून अधिक स्टॉल
या महोत्सवात विविध कंपन्यांचे शंभरहून अधिक स्टॉल राहणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीन दिवस या महोत्सवात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.