Jalna News : मत्स्योदरी मंदिर चोरीप्रकरणी तीन संशयित ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ः चोरट्यांमध्ये वाटण्यांवरून हाणामारी!
three suspects arrested in Matsyodari temple theft case jalna police
three suspects arrested in Matsyodari temple theft case jalna police sakal
Updated on

जालना : अंबड शहरातील मत्स्योदरी मंदिर चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी   तीन संशयितांना ताब्यात घेतले. तर चौथ्या संशयिताच्या शोधात एक पथक रवाना झाले. दरम्यान, मंदिरात चोरी केल्यानंतर पैशांच्या वाटणीवरून चोरट्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

three suspects arrested in Matsyodari temple theft case jalna police
Jalna News : मेडिकल कॉलेजसाठी दोनशे कोटी मंजूर; २५ एकरांवर होणार उभारणी

घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील राम मंदिर चोरीची घटना संपूर्ण राज्यात गाजली होती. त्यानंतर गुरुवारी  (ता.२०) रात्री अंबड शहरातील मत्स्योदरी मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी विधिमंडळात आमदार नारायण कुचे यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यामुळे हे प्रकरण  तत्काळ उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी घटनास्थळाची पाहणी करून चोरट्यांना जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दानपेटी फोडल्यानंतर गुन्ह्यात वापरलेली दोरी, कटर काही अंतरावर फेकून चोरटे पसार झाले होते. त्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता.

three suspects arrested in Matsyodari temple theft case jalna police
Jalna Crime : जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी हद्दपारीचे प्रस्ताव निकालाच्या प्रतीक्षेत

चौथ्या संशयिताचा शोध सुरू

मिळालेली माहिती आणि दानपेटीवरील ठसे असलेल्या संशयिताचा तपास करत स्थानिक गुन्हे शाखेने काजळा गाठत तीन संशयितांना ताब्यात घेतले. चोरी केल्यानंतर मद्याच्या नशेत चोरट्यांमध्ये पैशांवरून हाणामारी झाली. यात चौथ्या साथिदार पैसे घेऊन पसार झाल्याचे चौकशी दरम्यान पुढे आले. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक चौथ्या संशयितासा ताब्यात घेण्यासाठी सिल्लोड येथे गेले होते. रात्री उशिरापर्यंत हे पथक शहरात दाखल झाले नाही.

मुद्देमाल जप्त करणे बाकी

मत्स्योदरी मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, चोरीतील मुद्देमालाचा मोठा हिस्सा चौथा संशयित आरोपी घेऊन फरार झाल्याने मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे. शिवाय ताब्यात घेतलेल्या तीनही संशयितांना पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत अटक दाखविली नाही. त्यामुळे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे स्थानिक गुन्हे शाखेने जाहीर केली नाहीत.

three suspects arrested in Matsyodari temple theft case jalna police
Jalna : मत्स्योदरी देवीची दानपेटी फोडली; अज्ञात चोरट्याने चार ते पाच लाख रुपयांचा ऐवज केला लंपास

असा झाला गुन्हा उघड

१) दानपेटीवर एका चोरट्याच्या हाताचे  ठसे आढळून आले होते. हे ठसे पोलिस रेकॉर्डमधील एका आरोपीचे असल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले होते. त्यानूसार पोलिसांनी शोधमोहीम राबविली.

२) खबऱ्याने स्थानिक गुन्हे शाखेला माहिती देत सांगितले, की काही संशयितांकडे मद्य व जुगार खेळण्यासाठी मोठी रक्कम आली आहे. पोलिसांनी हा एक महत्त्वाचा दुवा मानला.

३) बदनापूर तालुक्यातील काजळा येथे पैशांच्या वाटणीवरून काहीजणांमध्ये वाद झाल्याची माहिती पोलिसांपर्यंत आली. तपासाअंती हे संशयित चोरटे असल्याची खात्री पोलिसांना पटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.