जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा लढा तिव्र झाला आहे. अशात राज्य शासनाकडून मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदीची तापसणी सुरू केली आहे. एकट्या जालना जिल्ह्यात आतापर्यंत २७ वर्षांच्या रेकॉर्ड तपासणीत तब्बल अडीच हजार नोंदी मिळाल्याची माहिती उच्चपदस्त सुत्रांनी 'सकाळ'ला दिली आहे.
विशेष म्हणजे एक नाही तर तब्बल प्रकारच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता ता.१२ ऑक्टोबर रोजी येणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीकडून अजून काय नवीन सुचना मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
जालन्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट मराठा कुणबी प्रमाण पत्र देण्याची मागणी केली होती. त्यानंतर महिनाभरात मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे सांगत उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची समजुद काढण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले होते.
शिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवृत्त न्यायमुर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती ही गठीत करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी निजामकाली नोंदी तपासण्याचे काम मागील महिनाभरापासून सुरू होते.
एकट्या जालना जिल्ह्यात मागील महिनाभरात २७ वर्षातील १७ ते १८ लाख दस्त तपासणी केल्यानंतर सुमारे अडीच हजार नोंद आढळुन आल्या आहेत. विशेष म्हणजे नोंदीमध्ये कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आशा तीन प्रकराच्या नोंदी आढळुन आल्या आहेत.
या नोंदीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून ता. १२ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात येणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीकडे सुपूर्त केला जाणार आहे. शिवाय या समितीकडून नागरिकांकडून नोंदीचे पुरावा ही स्वीकारले जाणार आहेत.
प्रशासनाला जुन्या रेकॉर्डमध्ये कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी मिळाल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढील काही काळात कायमस्वरूपी मार्गी लागण्याचे सकारात्मक चिन्हे दिसून येत आहेत.
१९४० ते १९६७ दरम्यान आढळल्या नोंदी
जिल्हा प्रशासनाने मागील महिनाभरात १९४० ते १९६७ या २७ वर्षातील १७ ते १८ लाख दस्तांचे रेकॉर्ड तपासणी केली आहे. या तपासणी दरम्यान सुमारे अडीच हजार कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा नोंदी मिळून आल्या आहेत.
निजामकाली आणि स्वातंत्र्यानंतर ही नोंदी
प्रशासनाकडून तपासण्यात आलेल्या दस्तांमध्ये १९४० ते १९४८ दरम्यान निजाम राजवटीली रेकॉर्डची तपासणी करण्यात आली आहे. या रेकॉर्ड तपासणीमध्ये कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी आढळुन आल्या आहेत. शिवाय ता.१७ सेंप्टबर १९४८ नंतर मराठवाडा निजाम राजवटीतून स्वतंत्र्य झाला. त्यानंतर १९६७ पर्यंतच्या रेकॉर्डमध्ये कुणबीच्या नोंदी आढळुन आल्या आहेत. मात्र, १९६९ नंतर कायद्यात बदल झाल्यानंतर या नोंदी पुढे राहिल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सन १३५० ची फसलीमध्ये (कृषी वर्ष) नोंदी
यापूर्वी जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील बारा गावांमध्ये कुणबी मराठा नोंदी मिळाल्या होत्यात. यात सन १३५० ची फसलीपासून (कृषी वर्ष) ते १९५४-५५ पर्यंत रेकॉर्डमध्ये या नोंदी आढळुन आल्या होत्या. यामध्ये घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी, रवना, वडीरामसगाव, जाफराबाद तालुक्यातील मेरखेडा, भोकरदन तालुक्यातील वालसावंगी, बदनापूर तालुक्यात किन्होळा, अंबड तालुक्यातील दहीपुरी, दाढेगाव, बारसवाडा, जालना तालुक्यातील वस्तीगव्हाण (मोतीगव्हाण) निरखेडा, धांडेगाव या गावांचा त्या अहवालात समावेश होता.
शिंदे समितीच्या सूचनांकडे लक्ष
जिल्ह्यात अडीच हजार कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी आढळुन आल्या आहेत. याचा अहवाल निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीकडे सादर केल्यानंतर यावर समिती या अहवाला अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर या समितीकडून प्रशासनाला नेकम्या काय सूचना येणार? मराठा आरक्षणासंदर्भात समिती काय ? निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.