नांदेड : ‘आज तीन चाकी रिक्षा आता तयार झाला आहे. हे तीन पक्ष म्हणजे तीन चाकं. ते आपापल्या दिशेने चालले आहेत. त्यावर मुख्यमंत्री म्हणतात, ‘ही रिक्षा आम्ही पुढे घेवून जावूच’. पण लक्षात ठेवा, रिक्षा हे गरीबाचे वाहन आहे. परंतु, नांदेडवरून मुंबईला, नागपूरला, दिल्ली जाता आलं, असं कधी ऐकलं का? कारण तीन चाकाच्या रिक्षांना मर्यादा असतात. त्यामुळे महाराष्ट्रात विकास होणे नाही. त्याला मोदींच्या विकासाचीच गाडी पाहिजे’, अशी टिका माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नांदेड येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते सोमवारी (ता.२७) बोलत होते. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार भिमराव केराम, भाजपचे महानराध्यक्ष प्रवीण साले, चैतन्यबापू देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते.
अंक गणितातून एक सरकार स्थापन
श्री. फडणवीस म्हणाले की, अंक गणितातून महाराष्ट्रात एक सरकार स्थापन झाले. अतिशय विरोधाभास असलेले हे सरकार आहे. ज्यांचे विचार, आचार, प्रचार एक नाही. अशा प्रकारचे तीन लोकं केवळ सत्तेकरिता एकत्र येवून सरकार स्थापन करतात. विचारांना तिलांजली देवून. तत्त्वांना तिलांजली देवून हे चित्र पहिल्यांदाच पहायला मिळालं.
हेही वाचलेच पाहिजे - आमचा चित्रपट बरा चाललाय- अशोक चव्हाण
देशाच्या इतिहासात असे घडलेच नाही
देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नसेल; की दोन पक्ष एकत्रित लढले, सत्तेवर आले, त्यांना जनतेने बहूमत दिले. आणि सरकार स्थापन व्हायच्या आधीच एक पक्ष पळून गेला आणि त्याने दुसऱ्यासोबत घरोबा केला. ही देशातील पहिली घटना कुठे झाली असेल तर ती महाराष्ट्रात झाली आहे. पण काळजी करू नका. भारतीय जनता पक्षावरच जनतेचा विश्वास आहे. म्हणूनच जनतेने आपल्याला सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत. सत्ता नसली म्हणून काय झाले, जनतेला न्याय देण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता लढतच राहील, अशी ग्वाही देखील श्री. फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिली.
खुर्चीच्या राजकारणासाठी एकत्र
खुर्चीच्या राजकारणासाठी एकत्र आलेल्या सरकारकडून सामान्य जनतेच्या अपेक्षा कधीच पूर्ण होणार नाही. सरकार स्थापनेपूर्वी अशोक चव्हाण यांनी शिवसेनेकडून लिहून घेवून त्यानंतर सरकार स्थापन केल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेनेची सत्तेसाठी इतकी काय मजबुरी होती; हे शिवसेनेने सांगितले पाहिजे. जे स्वतःच्या राजकारणासाठी सत्तेवर येतात ते फारकाळ टिकत नाहीत. अशा सरकारकडून जनतेनी फारशा अपेक्षा करु नयेत. शिवभोजनासाठी आणि शेतकरी कर्ज माफीसाठी लावण्यात आलेल्या अटी शर्थी घालुन सरकारकडून सामान्य जनतेची थट्टा सुरु आहे.
हेही वाचाच - प्रशिक्षणातून कृषि प्रक्रिया उद्योगासाठी मिळतेय चालना : कशी ते वाचायलाच हवे
‘सिएए’ कायद्याचा होतोय अपप्रचार
देशातील नागरीकांना नागरीकत्व देण्यासाठी मोदी सरकारने सीएए कायदा केला आहे. परंतु राष्ट्रवादी कॉग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडून जनतेचे डोके भडकविण्याचे काम करत आहेत. परंतु, मोदी लाटेला रोखण्यात या सराकरला अपयश येत आहे. त्यामुळेच हा खोडसाळपणा सुरु असून, देशप्रेमी राष्ट्रभक्तांनी मोदीच्या पाठिशी उभे राहावे. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातुन भारतीय जनता पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.
सावरकरांवर होतेय हिन दर्जाची टिका
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रजाने दोन वेळेस काळ्या पाण्याची शिक्षा दिली. त्याच स्वातंत्रवीर सावरकरांमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. परंतु काही लोक रोजच उठसुठ स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर हिन दर्जाची टिका करत आहेत. स्वातंत्रवीर सावरकर यांनी बारा वर्ष अंदमानच्या काळ्या कोठडीत काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. टिका करणाऱ्यांनीही त्यांच्याप्रमाणे किमान दहा तास काळ्या कोठडीत काढावेत त्यांना बक्षिस देतो, असा टोलाही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.