औंढा नागनाथ येथे पोलीस ठाण्यावर दगडफेक

दोन ते तीन दिवसांपूर्वी औंढा पोलिस ठाण्यात मुस्लिम समाजाला डिवचणारे मोबाईलवरुन कॉल आल्याने याबाबत औंढा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.
औंढा नागनाथ पोलिस ठाणे
औंढा नागनाथ पोलिस ठाणे
Updated on

औंढा नागनाथ ( जिल्हा हिंगोली ) : मशिदीत का जमला म्हणून एकाच्या मोबाईलवर (on call mobile) वारंवार फोन करुन शिवीगाळ केली जात असल्याच्या तक्रारीवर पोलिस काहीच कारवाई करीत नसल्याचा आरोप करीत औंढा पोलिस ठाण्यावरच हल्ला (Aundha nagnath police station) करण्याचा प्रकार शनिवारी (ता. १५ ) दुपारी घडला. बचावासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला असून अधिकाऱ्यांसह सात ते आठ कर्मचारीही दगडफेकीत जखमी झाले आहेत. (Thrill at Aundha Nagnath: Stone throwing at Thane; Faujdar injured with inspector, police firing in the air)

दोन ते तीन दिवसांपूर्वी औंढा पोलिस ठाण्यात मुस्लिम समाजाला डिवचणारे मोबाईलवरुन कॉल आल्याने याबाबत औंढा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. यावरुन पोलिस प्रशासन तपासही करीत होते. हा क्रमांक नेमका कुणाचा आहे, कशामुळे हा प्रकार घडला याची चौकशीही सुरु होती. दरम्यान, शुक्रवारी रमजान ईद झाल्यानंतर आज दीडशे ते दोनशे जणांचा जमाव पोलिस ठाण्यावर चालून गेला होता. त्यांनी या प्रकरणाची चौकशी का होत नाही, या कारणावरुन पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावरुनच ठाण्यावर दगडफेक सुरु केली.

हेही वाचा - हिंगोलीत ब्रेक दि चेन अंतर्गत सुधारित आदेश जारी; काय आहेत वाचा सविस्तर

दरम्यान पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असताना जमावाने मुंडे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. या हल्यात वाघमारे हे जखमी झाल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी हवेत गोळीबार केला. यानंतर हिंगोली पोलिसांची मोठी कुमक औंढा शहरात दाखल झाली असून पोलिस अधीक्षक राकेश कलासागर हे देखील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी औंढा पोलिस स्थानकात तळ ठोकून आहेत. दरम्यान पोलिस स्टेशनवर जमावान हा हल्ला का केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()