स्‍वच्‍छतेत राज्य राखीव पोलिस बल अव्वल

photo
photo
Updated on
हिंगोली : नागपूर येथे झालेल्या राज्य राखीव पोलिस बलाच्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्‍वच्‍छता ट्रॉफीमध्ये हिंगोलीच्या गटाने प्रथम क्रमांक मिळविला. समादेशक मंचक इप्पर यांना शुक्रवारी (ता. सहा) पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात स्‍वच्‍छता ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. हिंगोलीच्या गटाने राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेण्यात आली.

राज्यात राज्य राखीव पोलिस बलाचे एकूण १६ गट कार्यरत आहेत. यात एक प्रशिक्षण केंद्र आहे. त्‍यातील पुणे परिक्षेत्रात आठ गट व एक प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. नागपूर परिक्षेत्रात आठ गट कार्यरत आहेत. राज्य राखीव पोलिस बलाच्या वर्धापनदिनानिमित्त २०१६ पासून अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयातर्फे राज्य राखीव पोलिस बल स्‍वच्‍छता टॉफीचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार वर्धापनदिनामित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये हिंगोलीच्या गटानेही सहभाग घेतला होता. नागपूर परिक्षेत्रात कार्यरत असलेल्या आठ गटांचे मूल्यांकन मुंबई येथील अप्पर पोलिस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हिंगोलीच्या गटाचे मूल्यांकन गट क्रमांक अकरा मुंबईचे समादेशक सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखालील पथकाने फेब्रुवारी (ता.पाच) केले होते.

हेही वाचातूर विकण्यासाठी ‘जात’ सांगण्याची गरज काय ? ​

परिसराचे सुशोभीकरण

यात हिंगोलीच्या गटाने परिसर प्लॅस्टिक व प्रदूषणमुक्‍त करण्यात करण्यासाठी पुढाकार घेतला. बॅचलर बॅरक, कपंनी कार्यालय, बिनतारी संदेश विभाग, मोटार परिवहन विभाग येथे सुशोभीकरण करण्यात आले. तसेच परिसर साफ व स्‍वच्‍छ ठेवण्यात आला आहे. स्‍थानिक स्‍वराज्य संस्‍थेशी समन्वय साधून घंटागाडीद्वारे कचरा गोळा केला. त्याचे वर्गीकरण करून कंपोस्‍ट खत तयार करण्यात येत आहे.

शेततळ्यांच्या माध्यमातून मत्स व्यवसाय

तसेच २०१९ मध्ये १५ हजार ४८५ विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली. २४० एकरांचा परिसर स्‍वच्‍छ व सुंदर ठेवला. तसेच जिल्‍हा खादी ग्रामोद्योग यांच्या सहकार्याने मधुमक्षिका पालन केंद्र उभारण्यात आले आहे. मत्‍सबीज केंद्र इसापूर यांच्या सहकार्याने चार शेततळ्यांमध्ये मत्‍स्‍य व्यवसाय करण्यात येत आहे. या शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वॉटर हार्वेस्‍टिंग प्रकल्‍प राबविण्यात येत आहे. या सर्व उपक्रमांची पाहणी या पथकाने केली.
या उपक्रमाची दखल घेत अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयातर्फे हिंगोलीच्या गटाची निवड करण्यात आली असून स्‍वच्‍छतेसाठीचे प्रथक क्रमांक मिळाले आहे.

येथे क्लिक करा७७ कर्मचारी सापडले जाळ्यात ​

विविध उपक्रम राबविले जाणार

शुक्रवारी पुणे येथे हिंगोलीचे समादेश मंचक इप्पर यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. दरम्‍यान, समादेशक मंचक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली दिशा कल्याणकारी योजनेंतर्गत पोलिस कर्मचारी यांच्या कुटुंबीय व मुलांसाठी संगणक क्‍लास, नृत्‍य क्‍लास, स्‍पर्धा परीक्षा मार्गदर्शन, बॅडमिंटन क्लास, विविध खेळाचे क्‍लासेस, अबॅकस क्‍लासेस, वाचनालय तसेच महिलांसाठी शिवण क्‍लास, ब्‍युटी पार्लर, आत्‍मसरंक्षणासाठी प्रशिक्षण, कराटे क्‍लास, बचत गट स्‍थापन करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.