Bidkin News : समांतर जलवाहिनीचे कामाने तब्बल ३ तास वाहतुकीची कोंडी; रुग्णवाहिका १ तास अडकली

आजची वाहतूक कोंडी हि मोठ्या प्रमाणावर लांबच लांब रांगा व मोठ्या प्रमाणावर वाहने उभी राहिलेली परिस्थितीतील होती. तसेच जोरदार पावसाने हजेरी हि लावली होती.
Traffic Jam in Bidkin
Traffic Jam in Bidkinsakal
Updated on

- रविंद्र गायकवाड

बिडकिन - पैठण ते छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या समांतर जलवाहिनीच्या कासवगतीच्या सुरू असलेल्या कामाला मोठा वेळ लागत असल्याने वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील बिडकिन ते चितेगाव तब्बल ०७ किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी प्रत्येक वाहनधारकांना आज (ता. १०) शनिवार रोजी सायंकाळी ०३ वाजेपासून ०७ वाजेपर्यंत थांबावे लागण्याचा मोठा धक्का वाहनधारकांना बसला आहे.

बिडकिन ते पैठण रोडवरुन आपापल्या कामे आटोपून घराच्या दिशेने निघालेल्या सर्व वाहनधारक व नागरिकांना या वाहतुक कोंडीमुळे तब्बल तीन तासांपेक्षा जास्त वेळ जोरदार पावसात अडकुन जाण्याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. बिडकीनसह परिसरात वाहतूक कोंडी होत होती.

मात्र, आजची वाहतूक कोंडी हि मोठ्या प्रमाणावर लांबच लांब रांगा व मोठ्या प्रमाणावर वाहने उभी राहिलेली परिस्थितीतील होती. तसेच जोरदार पावसाने हजेरी हि लावली होती. आतापर्यंतच्या वाहतुकीची समस्या मध्ये हि सर्वात मोठी वाहतुक कोंडी झाली असल्याची चर्चा वाहनधारक व नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

वाहतूक कोंडी होण्याचे मुख्य कारण

बिडकिन‌ ते चितेगाव या परिसरातील चितेगाव गावानजीक व्हिडिओकॉन कंपनीसमोर एका बाजूने रोडचे काम सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला जलवाहिनी मध्ये पाईप दोन ते तीन हायड्रॉलिकच्या माध्यमातून नालीत पाईप सोडुन जोडणीचे काम सुरू असल्याने एक बाजुचा उर्वरित रस्ता बंद झाला होता. रोड व जलवाहिनीच्या कंत्राटदारांच्या वतीने कुठल्याही प्रकारची वाहनांना ये-जा करण्यासाठी पर्याय व्यवस्था न‌ केल्याने हि वाहतूक कोंडी झाली होती.

वाहतुक कोंडीमध्ये तब्बल १ तास रुग्णवाहिका व शववाहिका अडकल्याचा धक्कादायक प्रकार

पैठण वरुन खासगी रुग्णालयातील अर्धांगवायू चे पेशंट आशा मनोज चव्हाण यांना विलास बापू भुमरे प्रतिष्ठान रुग्णवाहिका चालक गणेश वीर हे घेऊन जात असताना तब्बल १ तास वाहतुक‌ कोंडीत अडकल्याची माहिती रुग्णवाहिका चालक वीर यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयातील उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या एका इसमाचा शव घेऊन जात असलेली शववाहिका हि वाहतूक कोंडीत अडकल्याचा प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी जोरदार पावसात उभे राहुन रुग्णवाहिका, शववाहिका आणि वाहतूक कोंडी केली सुरळीत

बिडकिन ते चितेगाव रोडवरील फारोळा ते चितेगाव व टोलनाका हद्दी पर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अचानक आलेल्या जोरदार पावसात पोलिस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलिस हेड कॉन्स्टेबल दिलीप साळवे, पोलिस कर्मचारी विष्णू चव्हाण, सचिन म्हस्के यांनी धावपळ करत वाहन चालक व नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिका, शववाहिका आणि वाहतूक कोंडी सुरळीत करत वाहतूक व्यवस्थीपणे चालु केल्यानंतर वाहनधारकांनी मोकळा श्वास घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.