परभणी : परभणीत आढळलेल्या पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. तो आढळलेल्या कंटेंटमेन्ट झोन परिसराच्या सर्वेक्षणाचे काम तिसऱ्या दिवशीही सुरू होते. तसेच यापुढेही १४ दिवस सातत्याने सुरू राहणार आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात आतापर्यंत नोंद झालेल्या संशयितांची संख्या ५२९ वर पोचली असून त्यापैकी ४५५ स्वॅब घेतल्यापैकी ३९९ जणांचा निगेटिव्ह अहवाल आला आहे. दरम्यान, रविवारी (ता.१९) नव्याने २१ संशयित दाखल झाले आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वंतत्र तयार करण्यात आलेल्या संसर्ग कक्षात संशयितांचे स्वॅब घेतले जात आहेत.
नव्याने २१ संशयित दाखल
परभणीत रविवारपर्यंत ५२९ संशयितांची नोंद झाली आहे. त्यापैकी ४५५ जणांचे स्वॅब घेतले होते. त्यातील ३९९ जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत, ३८ स्वॅब प्रलंबित आहेत, तर १७ स्वॅबची तपासणी करण्याची गरज नसल्याचा निर्वाळा राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांनी दिला आहे. रविवारी (ता.१९) जिल्ह्यात एकूण २१ संशयित दाखल झाले आहेत. तर एकूण २२ स्वॅब तपासणीसाठी औरंगाबादला पाठविले आहेत. २४४ जणांचे विलगीकरण करण्यात आले असून त्यांनी आपला कालावधी पूर्ण केला आहे. सध्या रुग्णालयात ४१ जण उपचार घेत आहेत.
हेही वाचा - आमदार बोर्डीकर यांच्यातर्फे मदत
‘सीइओं’नी दिली भेट
परभणीत आढळलेल्या पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. तो आढळलेल्या कंटेंटमेन्ट झोन परिसराच्या सर्वेक्षणाचे काम तिसऱ्या दिवशीही सुरू होते. तसेच यापुढेही १४ दिवस सातत्याने सुरू राहणार आहे. रविवारी (ता.१९) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देऊन कक्षाची पाहणी केली. औषधी साठा, वैद्यकीय उपकरणे,साधने आदी सुविधांची माहिती घेतली.
हेही वाचा - दारू कारखान्यावर छापे
हेही वाचा ...
तहसीलदारांची इन्सिडंट कमांडर म्हणून नियुक्ती
परभणी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार यांना त्यांच्या तालुक्यासाठी इन्सिडंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यासाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, वेळेत उपाययोजना राबवाव्यात यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांना प्राप्त अधिकारानुसार व राज्य शासनाच्या सुधारीत अधिसूचनाच्या अधिन राहात सर्व उपविभागीय दंडाधिकारी, सर्व तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणू संसर्ग कामकाजासाठी इन्सिडंट कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रविवारी (ता. १९) काढले आहेत. नियुक्त अधिकाऱ्यांनी शासनाच्या सूचनांनुसार उपाययोजना करण्यासाठी त्यांच्या अधिकाराचा वापर करावा, नियुक्त अधिकारी यांच्या अधिन असलेले मनुष्यबळ, साधनसामृग्रीचा यथोचित वापर करुन त्यांना सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी असे जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी आदेशात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.