Tuljapur Mandir : तुळजापुरात भक्ताने भवानी मातेला घातला चक्क चॉकलेटचा हार; वाद पेटणार?

Tuljapur Mandir Latest News : देवीचा गाभारा हा ऐतिहासिक आहे, त्यामुळे येथे नवनवीन प्रथा नको असे मत पुजारी मंडळाने व्यक्त केले आहे.
तुळजाभवानी माता
तुळजाभवानी माताsakal News
Updated on

धाराशिव : जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला राज्यभरातून हजारो भाविक येतात. यापैकी एका भक्ताने देवीला चक्क चॉकलेटचा हार घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर येथील पुजारी मंडळाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भक्ताने देवीसाठी चॉकलेटचा हार आणला होता. भक्ताने दिलेला हा चॉकलेटचा हार पुजाऱ्याने मंदीर संस्थांच्या परवानगीने देवीला घातल्याची माहिती आहे. मात्र देवीला चॉकलेटचा हार घातल्याने वाद उद्भवण्याची शक्यता असून याला पुजारी मंडळाने आक्षेप घेतला आहे.

देवीचा गाभारा हा ऐतिहासिक आहे, त्यामुळे येथे नवनवीन प्रथा नको असे मत पुजारी मंडळाने व्यक्त केले आहे. मंदीरासाठी देऊळ कवायत कायदा लागू असताना असे प्रकार चुकीचे आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी पुजारी मंडळाने केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.