तुळजापूर : तुळजाभवानी मातेचे नवरात्र मागील दोन वर्षांपासून प्रभारी मुख्याधिकाऱ्यांवरच पार पाडले जात आहे, असा आरोप महाविकासआघाडीच्या वतीने बुधवारी करण्यात आला.
येथील घाटशीळ रस्त्यावर महाविकास आघाडीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे अमोल कुतवळ म्हणाले, तुळजापूर शहरास मागील दोन वर्षांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाही. शहरात केवळ ३० टक्के स्वच्छता होत आहे, असा आरोप त्यांनी केला.
विद्युत दिव्यांची परिस्थितीही गंभीर बनलेली आहे, अनेक दिवे, हायमास्ट बंद आहेत. तसेच, शहरात काही भागांत १५ मिनिटे पाणी येते तर काही भागांत एक तास पाणी येते. हा दुजाभाव कशासाठी, असा आरोप त्यांनी केला. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख श्याम पवार म्हणाले, शहरातील बसस्थानकाचे बांधकामही निकृष्ट झालेले आहे.
यावेळी माजी नगरसेवक राहुल खपले, शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस उत्तम अमृतराव,, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख श्याम पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तोफिक शेख, शरद जगदाळे, शिवसेनेचे बापूसाहेब नाईकवाडी माजी नगरसेवक नागनाथ भांजी, नरेश पेंदे आदी उपस्थित होते.
तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील ऑनलाइन अभिषेक नोंदणी रात्री बारा वाजता सुरू होते. तसेच, अनेक वेळा साइट हॅक असते. तसेच, पहाटे तीन ते चार वाजता साइट सुरू होते. त्यावेळी पास फुल्ल आहेत, असे दाखविले जाते. त्यामुळे याबाबत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी.
- अमोल कुतवळ, तुळजापूर
तुळजापूर तीर्थक्षेत्राची दयनीय अवस्था झालेली आहे. शहरात भाविकांच्या हिताचे तसेच नागरिकांच्या हिताचे कुठलेही निर्णय होत नाहीत. आम्ही वारंवार तक्रारी करूनही प्रशासन हलत नाही, ते कोणाच्या इशाऱ्यावर चालते?
- राहुल खपले, माजी नगरसेवक, तुळजापूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.