‘या’ जिल्ह्यात हळद रुसली 

File photo
File photo
Updated on

नांदेड : कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत नवा मोंढा बाजारात सध्या हळदीच्या दरात प्रतिक्विंटल दोन हजरांपर्यंत घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडले आहेत.

राज्यात सांगलीनंतर नांदेड बाजारात हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होते. मराठवाड्यात सर्वात मोठे हळदीचे मार्केट असलेल्या या बाजारात नांदेड जिल्ह्यासह परभणी व हिंगोली जिल्ह्यातील हळद येते. नांदेडला बाहेर राज्यातील व्यापारी हळद खेरदीसाठी येतात. यामुळे येथील हळद बाजार नेहमीच चर्चेत राहतो.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पादनाचे हळद एकमेव पीक आहे. या हळदीला यंदा दिवाळीपूर्वी सात ते साडेसात हजार रुपये सरासरी दर मिळत होता. काही दिवस आठ हजारांच्या पुढे गेलेल्या दरात यानंतर मात्र, सतत घट येऊ लागली. नांदेड बाजारातून खरेदी झालेली हळद तामिळनाडू राज्यात सर्वाधिक जाते. तेथेही मालाला मागणी नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या हळदीचे पैसे व्यापाऱ्यांकडे लडकले आहेत. यामुळे खरिपातील पीक हातून गेलेले शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.

सरासरी दरात सतत घसरण
नांदेड बाजारात हळदीला सध्या सरासरी साडेपाच हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. २५ नोव्हेंबर रोजी बाजारात १४७ क्विंटल हळदीची आवक झाली. यास कमाल पाच हजार पाचशे, किमान चार हजार, तर सरासरी पाच हजार २८५ रुपये दर मिळाला. ता. २७ नोव्हेंबर रोजी ४०९ क्विंटल आवक झाली. यास कमाल सहा हजार ४९५, किमान पाच हजार ६८५, तर सरासरी पाच हजार २९५ रुपये दर मिळाला. ता. २९ नोव्हेंबर रोजी १५७ क्विंटल आवक झाली. यास कमाल पाच ७९५, किमान चार हजार सहाशे, तर सरासरी पाच हजार सहाशे दर मिळाला.

डिसेंबर महिन्यातील सरासरी दर
दोन डिसेंबर रोजी १५१ क्विंटल आवक झाली. यास कमाल पाच हजार चारशे, किमान पाच हजार दोनशे, तर सरासरी पाच हजार चारशे रुपये दर मिळाला. ता. तीन डिसेंबर रोजी शंभर क्विंटल आवक झाली. यास कमाल साडेपाच हजार, किमान पाच हजार २८०, तर सरासरी पाच हजार चारशे रुपये दर मिळाला. ता. पाच डिसेंबर रोजी १७२ क्विंटल आवक झाली. यास कमाल पाच हजार ५५५, किमान पाच हजार १९०, तर सरासरी चार हजार ५५५ रुपये दर मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.