Vidhansabha Election: बारा लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी केली जप्त

Parbhani Gangakhed Crime: रक्कम गंगाखेड पोलिस स्टेशन येथे जमा करण्यात आली.
Vidhansabha Election: बारा लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी केली जप्त
Updated on

गंगाखेड, ता. २७ (बातमीदार) : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जागोजागी पोलिस प्रशासनाची करडी नजर आहे. यामध्येच गंगाखेड शहरात पोलिसांच्या वतीने शनिवारी १२ लाख ६५ हजार ३२० रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या वतीने प्रत्येकाच्या हालचालीवर नजर ठेवली जात आहे. गंगाखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान गस्तीवर होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर हे अवैध धंद्यावर पायबंद ठेवण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना पालम रोडवरील उड्डाणपुलाच्या पुढे वाहन क्रमांक एम.एच.२२ ए. डब्ल्यू.८५७८ मध्ये पैशाची बॅग असल्याचे निदर्शनास आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.