उदगीर, (जि.लातुर) : सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता सुरु असुन पोलीस विभागाकडून समाज माध्यमांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यातच इंस्टाग्रामवर धारदार शस्त्र बाळगून रील बनवणाऱ्या एकावर व इंस्टाग्रामवर धारदार तलवार बाळगून प्रदर्शन करणाऱ्या एका अशा दोघा जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चालू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी इंस्टाग्राम, व्हाट्सअप, फेसबुक व अन्य समाज माध्यमांवर पोलीस विभागाकडुन करडी नजर ठेवली जात आहे.
त्यातच इंस्टाग्राम वर घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करून रील बनवणाऱ्या अमोल सुधाकर बिरादार (रा.वलांडी, ता.देवणी) यास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने पशुवैद्यक महाविद्यालय परिसरात ताब्यात घेऊन त्याच्याकडून धारदार चाकू जप्त केला आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, राम बनसोडे, संतोष शिंदे, नामदेव चेवले यांचा समावेश होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या पथकाने रविवारी (ता.२४) रोजी इंस्टाग्राम वर फोटो ठेवून दहशत निर्माण करणाऱ्या राजकुमार ज्ञानोबा आलावाड (रा.गोपाळ नगर) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन तलवारी व एक कोयता जप्त केला आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक श्री कुलकर्णी, श्री केंद्रे, श्री बिरादार, श्री गेडाम, राहुल गायकवाड यांचा समावेश होता. महाराष्ट्र अधिनियम कायदे अंतर्गत दोघांवरील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवकांनो सावधान रहा... पोलिसांची समाज माध्यमावर नजर आहे. सध्या आचारसंहिता व निवडणुकीचा काळ आहे. कायद्यानुसार घालून दिलेल्या चौकटीत राहून आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी करायचा आहे. आचारसंहितेचा भंग होईल असे कुठलेच कृत्य युवकांनी करू नये. वेळ आढळल्यास कारवाई निश्चितपणे होणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदर्श आचारसंहिता पालन निमित्त केलेल्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख व ग्रामीण पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.