उमरगा, (जि. धाराशिव) - उमरगा शहरातील बारा वर्षीय शाळकरी मुलाचा डेंगू आजाराने शनिवारी (ता.३१) पहाटे सोलापूर येथील खासगी रूग्णालयात मृत्यु झाला आहे. दरम्यान तीन दिवसापूर्वी तंत्र शिक्षणाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या मुलाचा डेंगूच्या आजाराने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.