Jalna News : मेडिकल कॉलेजसाठी दोनशे कोटी मंजूर; २५ एकरांवर होणार उभारणी

जालना : २५ एकरांवर होणार उभारणी, शासन निर्णय जारी
Two hundred crore sanctioned for medical college jalna education mla kailas kisanrao gorantyal
Two hundred crore sanctioned for medical college jalna education mla kailas kisanrao gorantyalsakal
Updated on

जालना : जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून मागणी असणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अखेर जालना येथे होणार असल्याचा शासन निर्णय शुक्रवारी (ता. १४) राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाने काढला आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी २१६.७५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

जालना येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी मागणी होत होती. यासाठी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आग्रही भूमिका घेत संघर्ष केला. या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनात आमदार श्री. गोरंट्याल यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलनही केले होते.

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होऊन शिंदे-फडणवीस यांचे राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही या वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाठपुरावा केला.

Two hundred crore sanctioned for medical college jalna education mla kailas kisanrao gorantyal
Jalna Rain Update : जालना शहरात बरसला जोरदार पाऊस; दोन दिवस यलो अलर्ट

या दोन नेत्यांच्या रेट्यांमुळे काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत जालना येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाने या संदर्भातील शासन निर्णय काढला आहे जालना येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे शहरातील २०४/१ मधील २५ एकर शासकीय जमिनीवर होणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी २१६.७५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय प्रशासकीय इमारत २८.९० कोटी, अचिकित्सालयीन, चिकित्सालयीन विभाग १३.६० कोटी, रुग्णालय इमारतीसाठी ९५.९२ कोटी आणि अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी वसतिगृहासाठी ७८.७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जालना शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Two hundred crore sanctioned for medical college jalna education mla kailas kisanrao gorantyal
Jalna News : जालना जिल्हाधिकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली; शासकीय कामकाजात गतिमानता

अशी आहे तरतूद

  • रुग्णालय इमारतीसाठी ९५.९२ कोटी

  • प्रशासकीय इमारतीसाठी २८.९० कोटी रुपये

  • अचिकित्सालयीन, चिकित्सालयीन विभाग १३.६० कोटी

  • निवासस्थाने, विद्यार्थी वसतिगृहासाठी ७८.७३ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.