अंबाजोगाई : जुन्या भांडणाची केस का काढून घेत नाहीस या कारणावरून शनिवारी रात्री केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले. या घटनेतील जखमीवर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेचा येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.