Cylinder Detonation : ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोटात दोघे जखमी;उमरगा येथील जकेकूर औद्योगिक वसाहतीतील घटना

शहराजवळील जकेकूर औद्योगिक वसाहतीतील रामराज अरी उद्योग प्लॅन्टमध्ये गुरुवारी (ता.२३) सायंकाळी ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट होऊन दोघे जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी उमरगा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
Cylinder Detonation
Cylinder Detonationsakal
Updated on

उमरगा : शहराजवळील जकेकूर औद्योगिक वसाहतीतील रामराज अरी उद्योग प्लॅन्टमध्ये गुरुवारी (ता.२३) सायंकाळी ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट होऊन दोघे जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी उमरगा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

रामराज अरी प्लॅन्ट येथे वाहनांचे जुने टायर जाळून ऑइल निर्मितीचा उद्योग आहे. उद्योगासाठी लागणारे लोखंडी टँक व इतर साहित्य तयार करून शिल्लक लोखंडी भंगाराची दोन ऑक्सिजन सिलिंडरच्या मदतीने गुरुवारी लोखंडी भंगारची कटाई सुरू होती. त्यावेळी अचानक स्फोट होऊन सिलिंडर चक्क ५० ते ६० फूट उंचीवर पत्र्याला जाऊन धडकले.

यामुळे पत्रा फाटला. याच दरम्यान कटाईचे काम करणारे अभिषेक शिवशंकर रेड्डी (वय १९) आणि गुड्डूसाब मोहम्मदसाब नदाफ (वय २६, दोघे रा. बसवकल्याण, जि. बिदर) हे जखमी झाले. त्यांच्यावर सोलापूरमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिस निरीक्षक डी. बी. पारेकर व कर्मचाऱ्यांनी रात्री घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, या घटनेशी संबंधित उद्योग कंपनीने आमचा संबंध नसल्याचा दावा केला असला तरी मुळात ही घटना कंपनीच्या शेडमध्ये घडली आहे.

ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोटात दोघे कामगार जवळपास २५ ते ३० टक्के भाजल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. जखमी कामगारांवर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेसंदर्भातील चौकशी सुरू आहे.

- डी. बी. पारेकर, पोलिस निरीक्षक, उमरगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.