Kej Car Accident : रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला कारची भीषण धडक; अपघातात दोघे जागीच ठार तर तिघे जखमी

Kej Car Accident Latest News : हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला असून जोराची धडक बसल्याने ट्रकच्या मागील डाव्या बाजूचे टायर फुटले आहे.
Two killed in an accident where  car collided with a stationary truck on kej Manjarsumba road
Two killed in an accident where car collided with a stationary truck on kej Manjarsumba road
Updated on

केज : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगात येणाऱ्या स्विफ्ट कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याची घटना केज-मांजरसुंबा रस्त्यावरील कोरेगाव फाट्या जवळ बुधवारी (ता.२६) रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये कारमधील आंध्रप्रदेशातील अनोळखी एक महिला व एक पुरूष अशा दोघांचा तर जखमींमध्ये ट्रक चालकासह कारमधील दोघांचा समावेश आहे.

केज-मांजरसुंबा रस्त्यावरील कोरेगाव फाट्याजवळ वळणावर बीडहून अंबाजोगाई शहराच्या दिशेने निघालेला ट्रक (एम एच-४४/ए बी-८७८६) बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यावेळी ट्रक चालक हा वाहनाच्या खाली उतरून ट्रकची पाहणी करीत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने (एपी-३९/एसएस-५६५७) उभ्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्यातील समोर बसलेले आंध्रप्रदेशातील अनोळखी एक महिला व एक पुरुष अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमध्ये पाठीमागे बसलेले श्रुती संकुता, (रा. गुडीवाडा आंध्रप्रदेश) व एक अनोळखी पुरुष हे दोघे जखमी झाले. तसेच ट्रक चालक रियाज तुराबखॉऺं पठाण (रा. पाटोदा जि. बीड) हे देखील जखमी झाला आहे.

Two killed in an accident where  car collided with a stationary truck on kej Manjarsumba road
Telangana Crime : संतापजनक! डाळिंब तोडल्याचा रागातून दलित मुलाला दोरीने बांधून मारहाण; आरोपी निवृत्त मुख्याध्यापक

हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला असून जोराची धडक बसल्याने ट्रकच्या मागील डाव्या बाजूचे टायर फुटले आहे.

या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे जखमी झाले असून दोन मयत व एक जखमी हे आंध्रप्रदेशातील असल्याने त्यांची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी आंध्रप्रदेशातील मयताच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून मयत व जखमी हे परराज्यातील असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भाषेची अडचण येत आहे. कारण त्यांना तेलगू भाषे व्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा समजत नाही.

Two killed in an accident where  car collided with a stationary truck on kej Manjarsumba road
Rahul Gandhi LoP: राहुल गांधी कोणामुळे झाले विरोधी पक्षनेते? जाणून घ्या, पडद्यामागं काय घडलं

अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस नाईक त्रिंबक सोपने, राजू गुंजाळ, रशीद शेख हे घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना शासकीय रूग्णवाहिकेतून केज शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांचे दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आले आहे. पोलीसांनी मयतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून ते बुधवारी रात्री उशीरापर्यंत केज शहरात पोहोचतील. त्यानंतरच अनोळखी मृत व जखमींची ओळख पटण्यास मदत होणार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.