Car Accident : आजारी भावावर उपचार करुन परतताना कारचा भीषण अपघात; दोघे ठार, बहीण गंभीर जखमी

डिग्रस (ता. उदगीर) जवळील पुलाच्या कठड्याला कार धडकल्याने गाडीतील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Udgir Car Accident
Udgir Car Accidentesakal
Updated on
Summary

हा गुन्हा करुन कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. उदगीर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

उदगीर (जि. लातूर) : डिग्रस (ता. उदगीर) जवळील पुलाच्या कठड्याला कार धडकल्याने गाडीतील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, या अपघातात (Car Accident) एकजण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी कारचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्यात आज गुरुवारी (ता. २७) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उदगीरमधील रहिवासी फिर्यादी आसिफ हबीबखाँ पठाण (वय ३२, ऑटो चालक रा. गोविंदनगर नांदेड रोड उदगीर) यांची आई, भाऊ व बहीण हे छत्रपती संभाजीनगरमधून भाऊ जाफर आजारी असल्यामुळे त्याच्यावर उपचार करुन कारमधून (क्र. एमएच १२ वायए ५४२६) ते उदगीरकडे येत होते.

Udgir Car Accident
Nagpur Police : फोटोग्राफर विनय पुणेकरची गोळ्या झाडून हत्या; चार महिन्यानंतर मारेकऱ्याला लुधियानातून अटक

दरम्यान, मौजे डिग्रस येथे कारचालक नामे नौमान कुरेशी (रा. शकील चौक, उदगीर) याने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात कार चालवल्याने गाडी पुलाच्या कठड्याला धडकली. यात फिर्यादीची आई शबीरबी पठाण (वय ५५), भाऊ जाफर पठाण (वय २५) यांचा मृत्यू झाला तर, बहीण शाहीन ही गंभीर जखमी झाली. हा गुन्हा करुन कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. उदगीर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.