Jintur Accident : जिंतूर तालुक्यात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

जिंतूर तालुक्यात गुरुवारी अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
Kailas Banduke
Kailas Bandukesakal
Updated on

जिंतूर - तालुक्यात गुरुवारी अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. याबाबत उशिरा समजलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील येलदरी प्राथमिक आरोग्यकेंदातील आरोग्य सेवक कैलास बंदुके हे कार्यातील कामकाज आटोपून दुपारी दुचाकी (क्रमांक एमएच ३८ झेड २३७५) वरून गावाकडे करंजी (ता. हिंगोली) येथे परत जात असताना येलदरी धरणाच्या समोरील अरुंद पुलावरच्या कठड्याला त्यांची दुचाकी धडकून ते खाली नदीपात्रात पाण्यात पडून गंभीर जखमी झाले.

जवळपासच्या नागरिकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले. यावेळी येलदरी आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी तेथून जात असताना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी जखमी बंदुके यांना जिंतूर येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रथमोचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले तेथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दुसऱ्या अपघातात ट्रॅक्टर पलटी होऊन अंगावर पडल्याने सालगड्याचा मृत्यू

तालुक्यातील डोंगर भागात मांडवा येथील सालगडी सखाराम शेळके हे कामानिमित्त कांही मजूर घेऊन जिंतूरकडे येत असताना परिसरात खरदडी शिवारातील उतारावर अचानक ट्रॅक्टर पलटी झाला. यामध्ये सालगडी सखाराम शेळके हे ट्रॅक्टरखाली अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक व इतर मजुरांनी प्रसंगावधान ओळखून ट्रॅक्टर पलटी होताच खाली उड्या मारल्याने ते बचावले. ब्रेक फेल झाल्याने ट्रॅक्टर पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेहावर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून अद्याप जिंतूर पोलीसात गुन्ह्याची नोंद झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.