जालना,ता.२१ ः दरोड्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केलेल्या प्रकरणी जालना येथील दोन पोलिस निरीक्षक व दहा पोलिस कर्मचाऱ्यांचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी शुक्रवारी (ता.२०) रात्री उशिरा निलंबनाचे आदेश दिले आहेत.
शहरातील कदीम जालना पोलिस ठाण्यात तत्कालीन एडीएसच्या पथकाकडून आपल्यावर ता. चार जानेवारी रोजी दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल करून अडकविण्यात आल्याची तक्रार अनिल गोरखनाथ ओलेकर (वलेकर) याने विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार केली होती.
हेही वाचा : जालना बनलाय गावठी बंदुकवाल्यांचा अड्डा?
या तक्रारीनंतर विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या आदेशाने ता.२६ फेब्रुवारी रोजी पैठण-फुलंब्रीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भांबरे यांचे पथक चौकशीकामी जालना येथे आले होते. या पथकाने दोन पोलिस निरीक्षक, व पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी केली होती. तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय, कदीम जालना पोलिस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती. या चौकशीनंतर दरोड्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात विशेष पोलिस महानिरीक्षक सिंघल यांनी तत्कालीन एडीएसचे पथक प्रमुख पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांच्यासह दहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
दरोड्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केलेल्या प्रकरणी दोन पोलिस निरीक्षकांसह दहा पोलिस कर्मचाऱ्यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरू आहे, ही चौकशी पूर्ण होईपर्यंत हे निलंबन करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.